आधी छातीत चाकू खोपसून हत्या, मग गाड्यांनी चिरडलं, अपघात सांगून विम्याचे पैसे उकळणाऱ्या टोळीचा भांडाफोड

तेलंगणाच्या नलगोंडा जिल्ह्यात पाच जणांच्या एका टोळीने चक्क लोकांच्या इन्शूरन्सचे पैसे मिळावे म्हणून काही जणांची हत्या केली (five arrested in Telangana on fraudulent life insurance claims by killing people).

आधी छातीत चाकू खोपसून हत्या, मग गाड्यांनी चिरडलं, अपघात सांगून विम्याचे पैसे उकळणाऱ्या टोळीचा भांडाफोड
Tiroda police raids
चेतन पाटील

|

Mar 10, 2021 | 4:55 PM

हैदराबाद (तेलंगणा) : गुन्हेगारांची विकृती कोणत्या थरावर जाईल याचा काहीच अंदाज बांधता येणार नाही. तेलंगणाच्या नलगोंडा जिल्ह्यात पाच जणांच्या एका टोळीने चक्क लोकांच्या इन्शूरन्सचे पैसे मिळावे म्हणून काही जणांची हत्या केली आणि ती हत्या अपघात असल्याचं दाखवत इन्शुरन्सचे पैसे बळकावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे (five arrested in Telangana on fraudulent life insurance claims by killing people).

चार जणांची कट रचून हत्या

नालगोंडा जिल्हा पोलीस अधीक्षक एव्ही रंगनाथन यांनी याप्रकरणाची माहिती दिली. या प्रकरणातील मुख्य आरोपी हा एका फायनान्शिअल कंपनीत कार्यरत होता. या आरोपीने त्याच्या चार सहकाऱ्यांसोबत 2013 ते 2017 या कालावधीत चार जणांची कट रचून हत्या केली. त्यानंतर विमा कंपन्यांना अपघात सांगून विम्याचे पैसे उकळले (five arrested in Telangana on fraudulent life insurance claims by killing people).

आरोपी विम्याचे पैसे कसे उकळायचे?

आरोपी दारुचं व्यसन असलेले किंवा आजारी असलेल्या व्यक्तीला लक्ष्य करायचे. आरोपी लोकांच्या छातीत चाकूने वार करुन निदर्यीपणे हत्या करायचे. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्यांखालून मृतदेहाला चिरडायचे. पुढे संबंधित व्यक्तीचा अपघातात मृत्यू झाल्याचा दाखला देत आरोपी विम्याचे पैसे उकळायचे.

विशेष म्हणजे या सर्व प्रकरणात ते मृतकाच्या कुटुंबियांना विश्वासात घेऊन हा सर्व संतापजनक प्रकार करायचे. आजारी किंवा दारुचं व्यसन असलेल्या नागरिकांना लक्ष्य करुन त्याची हत्या करायची. त्यानंतर अपघात सांगून विम्याचे पैसे मिळवायचे. त्या विम्यातील ठरलेली रक्कम मृतकाच्या कुटुंबियांना द्यायची. तर उर्वरित रक्कम स्वत:कडे ठेवायची. या टोळीने आतापर्यंत जवळपास 1 कोटी 59 लाख रुपयांचा दावा करुन विमा कंपन्यांकडून पैसे उकळले आहेत.

गुन्हेगार कसे पकडले गेले?

आरोपींनी जवळपास पाचवेळा अशाप्रकारचं कृत्य केल्यामुळे त्यांचा हव्यास वाढला होता. मात्र, कानून के हाथ लंबे होते है, या म्हणीप्रमाणे ते पोलिसांच्या जाळ्यात बरोबर अडकले. पोलिसांना 24 फेब्रुवारी रोजी माहिती मिळाली की, एका व्यक्तीचा खून झालाय. मात्र, त्या व्यक्तीचा रस्ते अपघातात मृत्यू झाला, असं कागदपत्रात दाखवण्यात आलं होतं. पोलिसांनी तपास सुरु केला. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये संबंधित व्यक्तीवर हल्ल्या झाल्याने जखम झाली, त्या जखमेमुळे त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती उघड झाली. पोलिसांनी मृतकाच्या कुटुंबियांची चौकशी केली. त्यानंतर पोलिसांनी पाच जणांना अटक केली.

हेही वाचा : जनतेचा रक्षक निघाला तस्कर, नवापूरच्या नगरसेवकाकडून गुजरातमध्ये दारुची तस्करी, पोलिसांनी रंगेहाथ पकडलं

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें