AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये मेगा भरती, दहावी पास असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी, लगेचच करा अर्ज

दहावी पास असणाऱ्यांसाठी ही अत्यंत महत्वाची बातमी आहे. विशेष म्हणजे थेट सरकारी नोकरी करण्याची मोठी संधी आहे. उशीर न करता इच्छुकांनी या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावीत. ही मोठी संधी आहे. थेट सेंट्रल बँक ऑफ इंडियाकडून ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे.

सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये मेगा भरती, दहावी पास असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी, लगेचच करा अर्ज
| Updated on: Dec 25, 2023 | 1:11 PM
Share

मुंबई : सरकारी नोकरी करण्याचे जर तुमचे स्वप्न असेल तर ही मोठी संधी तुमच्यासाठी आहे. विशेष म्हणजे थेट बँकेमध्ये नोकरी करण्याची संधी आहे. नुकताच या बंपर भरतीला सुरूवात झालीये. विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडत आहे. दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरी करण्याची ही मोठी सुवर्णसंधीच आहे. अजिबातच उशीर न करता उमेदवारांनी फटाफट या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. थेट सेंट्रल बँक ऑफ इंडियाकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. या भरती प्रक्रियेबद्दलची नुकताच अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीये.

सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये काम करण्याची संधी दहावी पास उमेदवारांसाठी आहे. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना फक्त आणि फक्त आॅनलाईन पद्धतीनेच अर्ज करावा लागेल. Centralbankofindia.co.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. या साईटवरच तुम्हाला भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल. तिथूनच तुम्हाला या भरतीसाठी अर्ज करावा लागेल.

ही भरती प्रक्रिया 484 पदांसाठी होत आहे. विविध राज्यांसाठी ही भरती प्रक्रिया सेंट्रल बँक ऑफ इंडियाकडून राबवली जात आहे. सफाई कर्मचारी कम उप-कर्मचारी या पदांसाठी ही भरती पार पडत आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करत असलेला उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी पास असलेला असावा. त्याच्याकडे दहावी पासचे प्रमाणपत्र असावे.

या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराला वयाची अट ही देखील ठेवण्यात आलीये. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे कमीत कमी वय हे 18 आणि जास्तीत जास्त 26 असावे. विशेष म्हणजे विविध भाषांमध्ये या भरती प्रक्रियेसाठी परीक्षा घेतली जाईल. ही परीक्षा आॅनलाईन पद्धतीनेच घेतली जाणार आहे.

दहावी पास असणाऱ्या उमेदवारांसाठी खरोखरच ही मोठी संधी आहे. देशातील कोणत्याही कानाकोपऱ्यात बसून तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकता. या भरती प्रक्रियेबद्दलच्या सर्व अपडेटसाठी तुम्ही Centralbankofindia.co.in ला भेट द्या. चला तर मग अर्ज करण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत. लगेचच करा या भरतीसाठी अर्ज

Follow Us
निवडणूक आयोगाने जाहीर केली बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीची तारीख
निवडणूक आयोगाने जाहीर केली बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीची तारीख.
पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ विधानसभा निवडणुकीसाठी तारीखा जाहीर
पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ विधानसभा निवडणुकीसाठी तारीखा जाहीर.
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोगाची महत्त्वाची पत्रकार परिषद
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोगाची महत्त्वाची पत्रकार परिषद.
पुणे मेट्रोला नागरिकांचा चांगला प्रतिसाद; प्रवासी संख्या अडीच लाखांवर
पुणे मेट्रोला नागरिकांचा चांगला प्रतिसाद; प्रवासी संख्या अडीच लाखांवर.
पुण्यात आणखी एका वैष्णवीने जीवन संपवलं; सासरच्या जाचाला कंटाळून....
पुण्यात आणखी एका वैष्णवीने जीवन संपवलं; सासरच्या जाचाला कंटाळून.....
बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीवर अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया
बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीवर अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया.
पदवी घ्यावी की नको, कारण मानद पदवी मिळाल्यानंतर फडणवीस असं का म्हणाले?
पदवी घ्यावी की नको, कारण मानद पदवी मिळाल्यानंतर फडणवीस असं का म्हणाले?.
महापौरांच्या गाडीवर लाल दिव्यावरून राजकारण तापलं
महापौरांच्या गाडीवर लाल दिव्यावरून राजकारण तापलं.
बारामती, राहुरी पोटनिवडणुकीबाबत देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
बारामती, राहुरी पोटनिवडणुकीबाबत देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मानद डॉक्टर ऑफ सायन्स पदवी प्रदान
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मानद डॉक्टर ऑफ सायन्स पदवी प्रदान.