AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

परीक्षा न देता मिळवा सरकारी नोकरी, 90 हजारांपर्यंत पगार आणि…

Sarkari Naukri 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक सुवर्णसंधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी वेळ वाया न घालता भरतीसाठी अर्ज करावा. भरती प्रक्रियेची अधिसूचना देखील काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध करण्यात आलीये. ही मोठी संधी नक्कीच आहे.

परीक्षा न देता मिळवा सरकारी नोकरी, 90 हजारांपर्यंत पगार आणि...
National Mineral Development Corporation Limited
| Updated on: Jul 10, 2024 | 3:36 PM
Share

जर तुम्ही नोकरीच्या शोधात आहात तर ही एक अत्यंत मोठी बातमी तुमच्यासाठी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता भरतीसाठी फटाफट अर्ज करावीत. विशेष म्हणजे सरकारी नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. या भरती प्रक्रियेची अधिसूचना ही काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध करण्यात आलीये. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज ही करावी लागणार आहेत. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक आणि अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया.

नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (NMDC) मध्ये नोकरी करण्याची संधी आहे. नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. या भरती प्रक्रियेची सर्वात विशेष बाब म्हणजे कोणत्याही प्रकारची परीक्षा वगैरे उमेदवारांना अजिबातच द्यावी लागणार नाहीये. थेट मुलाखतीमधूनच उमेदवाराची निवड ही केली जाईल. 

भरती प्रक्रियेतून निवड झालेल्या उमेदवारांना चक्क 60 हजार ते 90 हजारांपर्यंत महिना पगार मिळणार आहे.  nmdc.co.in या साईटवर जाऊन आपल्याला भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. याच साईटवर आपल्याला भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल. लक्षात ठेवा की, ही भरती प्रक्रिया शिकाऊ उमेदवारांसाठी सुरू आहे.

या भरती प्रक्रियेसाठी वयाची आणि शिक्षणाची अट ही लागू करण्यात आलीये. अभियांत्रिकी शाखेतील पदवी किंवा डिप्लोमा उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे. यासोबतच उमेदवाराला 4 ते 6 वर्षांचा कामाचा अनुभव देखील असाला. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे 40 पेक्षा अधिक नसावे. यामध्ये प्रवर्गातील उमेदवारांना वयाच्या अटीमध्ये थोडी सूट देण्यात आलीये. 

नोकरीचे ठिकाण हे देशभरात कुठेही असू शकते. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अर्ज करावीत. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी आता अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याच्या अगोदर उमेदवाराने भरतीची अधिसूचना ही व्यवस्थित वाचून घ्यावी आणि मगच भरतीसाठी अर्ज करावा.

कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.