SECL Recruitment 2021: साऊथ इस्टर्न कोलफील्डस लिमिटेडमध्ये भरती, क्लार्कपदी नोकरी मिळवण्याची संधी

साऊथ इस्टर्न कोलफील्डस लिमिटेडच्यावीतनं क्लार्क पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पात्र आणि इच्छूक उमेदवार 16 सप्टेंबरपर्यंत अर्ज सादर करु शकतात.

SECL Recruitment 2021: साऊथ इस्टर्न कोलफील्डस लिमिटेडमध्ये भरती, क्लार्कपदी नोकरी मिळवण्याची संधी
प्रातिनिधिक फोटो

SECL Recruitment 2021 नवी दिल्ली: साऊथ इस्टर्न कोलफील्डस लिमिटेडच्यावीतनं क्लार्क पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पात्र आणि इच्छूक उमेदवार 16 सप्टेंबरपर्यंत अर्ज सादर करु शकतात. इच्छूक उमेदवार साऊथ इस्टर्न कोलफील्डसच्या वेबसाईटवरुन अर्ज डाऊनलोड करु शकतात. उमेदवारांनी www.secl-cl.in या वेबसाईटवर जाऊन नमुना अर्ज डाऊनलोड करु शकतात.

किती पदांसाठी भरती

साऊथ इस्टर्न कोल्ड फील्ड्स कडून 196 क्लार्क पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. उमेदवार सविस्तर माहिती वेबसाईटला भेट देऊन सविस्तर नोटिफिकेशन वाचू शकतात.

पात्रता

साऊथ इस्टर्न कोल्ड फील्ड्सनं जारी केलेल्या नोटिफिकेशननुसार दहावी उत्तीर्ण उमेदवार आणि तीन वर्ष कंपनीतील कामकाजाचा अनुभव असणारे उमेदवार अर्ज दाखल करु शकतात.

निवड प्रक्रिया

उमेदवारांकडून अर्ज प्राप्त झाल्यानंतर लेखी परीक्षेचं आयोजन केलं जाणार आहे. लेखी परीक्षा झाल्यानंतर उमदेवारांची संगणक क्षमता चाचणी घेतली जाईल, त्यानंतर उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनी लिमिटेडमध्ये 300 पदांसाठी भरती

न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनी लिमिटेडद्वारे प्रशासकीय अधिकारी पदासाठी भरतीसाठी नोटिफिकेशन जारी करण्यात आली आहे. नोटिफिकेशननुसार एकूण 300 पदांवर भरती होणार आहे. सरकारी नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांसाठी संधी आहे. न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनी लिमिटेडमध्ये अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट newindia.co.in वर भेट द्यावी लागेल.

न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनी लिमिटेडने जारी केलेल्या नोटिफिकेशननुसार, अर्ज सादर करण्याची प्रक्रिया 1 सप्टेंबर 2021 पासून सुरू होईल. अर्ज दाखल करण्यासाठी 21 सप्टेंबरपर्यंत वेळ दिला जाईल. अर्जाचं शुल्क 21 सप्टेंबर रोजीचं जमा करावं लागेल. दोन टप्प्यात परीक्षा आयोजित केली जाईल. त्यानंतर उमेदवारांची निवड केली जाईल.मात्र, परीक्षेची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.

या पदांसाठी अर्ज प्रक्रिया 1 सप्टेंबरपासून सुरू होईल. भरती प्रक्रियेंतर्गत एकूण 300 पदांची भरती केली जाणार आहे. यामध्ये खुल्या प्रवर्गासाठी 104 जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. ओबीसीसाठी 81 जागा, आर्थिकदृष्ट्या दुर्बल म्हणजेच ईडब्ल्यूएससाठी 30 जागा, एससीसाठी 46 जागा, एसटीसाठी 22 जागा आणि दिव्यांग उमेदवारांसाठी 17 जागा निश्चित करण्यात आल्या आहेत.

इतर बातम्या:

ISRO LPSC Recruitment 2021: इस्त्रो एलपीएससीमध्ये विविध पदांवर भरती, अर्ज कुठे करायचा?

SBI SCO Recruitment 2021: स्टेट बँकेत नोकरी मिळण्याची संधी, स्पेशालिस्ट केडर ऑफिसर पदासाठी भरती

South Eastern Coalfields Limited has invited applications 196 posts of clerk

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI