SSC CHSL Exam Postponed: स्टाफ सिलेक्शन कमिशनची सीएचएसएल टियर 1 परीक्षा स्थगित
स्टाफ सिलेक्शन कमिशनच्यावतीने सीएचएसएल टियर -1 परीक्षा स्थगित करण्यात आली आहे. SSC CHSL Exam Postponed

SSC CHSL Exam 2020 Postponedनवी दिल्ली: स्टाफ सिलेक्शन कमिशनच्यावतीने आयोजित सीएचएसएल टियर -1 (SSC CHSL Tier 1 exam Postponed) परीक्षा स्थगित करण्यात आली आहे. कर्मचारी चयन आयोग म्हणजेच स्टाफ सिलेक्शन कमिशननं याबाबत सूचना जारी केली आहे. या भरतीद्वारे एकूण 4726 पदांवर उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. ही परीक्षा 12 ते 27 एप्रिल दरम्यान घेण्यात येत होती. परीक्षेची नवीन तारीख लवकरच जाहीर केली जाणार आहे. (SSC CHSL Exam Postponed by SSC due to covid outbreak new notification released soon)
पश्चिम बंगालमध्ये अगोदरचं परीक्षा लांबणीवर
स्टाफ सिलेक्शन कमिशनद्वारे सीएचएसएल (Combined Higher Secondary (10+2) Level) परीक्षेचं नोटिफिकेशन 06 नोव्हेंबर 2020 ला जारी करण्यात आलं होते. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 26 डिसेंबरपर्यंत सुरू होती. यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना टियर -1 आणि टियर -2 परीक्षेमध्ये सहभागी व्हावं लागणार आहे. ही परीक्षा 12 एप्रिल ते 27 एप्रिल घेण्यात येत होती. आता परीक्षा स्थगित करण्यात आली. देशातील वाढती कोरोना रुग्ण संख्या पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे. पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका असल्यानं त्या राज्यातील परीक्षा मे महिन्यात घेण्यात येणार होती.
निवड प्रक्रिया
Combined Higher Secondary (10+2) Level परीक्षेद्वारे लोअर डिव्हिजनल क्लार्क, ज्यूनियर सेक्रेटेरीएट असिस्टंट, पोस्टल असिस्टंट, सॉर्टिंग असिस्टंट, डाटा एंट्री ऑपरेटर्स (DEOs) पदांवर निवड केली जाणार आहे. या पदांवर निवड होण्यासाठी उमेदवारांना टियर 1, टियर 2 आणि कौशल्य चाचणी परीक्षा द्यावी लागणार आहे. टियर 1 मध्ये 100 गुणांसाठी बहूपर्यायी स्वरुपात परीक्षा होणार आहे.यात निवडले जाणाऱ्या उमेदवारांना स्किल टेस्टमध्ये सहभागी व्हावे लागेल. कौशल्य चाचणीनंतर उमेदवारांची निवड अंतिम गुणवत्तेच्या आधारे केली जाईल.
भरतीचा तपशील
या भरती प्रक्रियेद्वारे एकूण 4726 पदांवर भरती होईल. लोअर डिव्हिजन लिपिक, कनिष्ठ सचिवालय सहाय्यक, टपाल सहाय्यक, क्रमवारी सहाय्यक, डेटा एन्ट्री ऑपरेटर (डीईओ) या पदांवर भरती होईल. रिक्त पदाच्या संपूर्ण तपशिलांसाठी या लिंकवर क्लिक करा.
राज्यात आणखी कठोर लॉकडाऊन अटळ, अजित पवारांची मुख्यमंत्र्यांशी महत्त्वपूर्ण चर्चा? https://t.co/OOXy9cYOOj #maharashtralockdown #AjitPawar #UddhavThackeray #coronavirus
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 20, 2021
संबंधित बातम्या
WCR Apprentice Recruitment 2021 : पश्चिम रेल्वेत दहावी पाससाठी बंपर भरती, 30 एप्रिलपर्यंत करा अर्ज
SSC CHSL Tier I Admit Card 2020: स्टाफ सिलेक्शन सीएचएसएल परीक्षेचे प्रवेशपत्र जारी, डाऊनलोड करण्याच्या सोप्या टिप्स
(SSC CHSL Exam Postponed by SSC due to covid outbreak new notification released soon)
