SSC CHSL Tier I Admit Card 2020: स्टाफ सिलेक्शन सीएचएसएल परीक्षेचे प्रवेशपत्र जारी, डाऊनलोड करण्याच्या सोप्या टिप्स

स्टाफ सिलेक्शन कमिशनच्यावतीने आयोजित सीएचएसएल टियर -1 (SSC CHSL Tier I Admit Card 2020) परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर करण्यात आले आहे.

SSC CHSL Tier I Admit Card 2020: स्टाफ सिलेक्शन सीएचएसएल परीक्षेचे प्रवेशपत्र जारी, डाऊनलोड करण्याच्या सोप्या टिप्स
SSC
Follow us
| Updated on: Mar 28, 2021 | 3:44 PM

SSC CHSL Tier I Admit Card 2020 नवी दिल्ली: स्टाफ सिलेक्शन कमिशनच्यावतीने आयोजित सीएचएसएल टियर -1 (SSC CHSL Tier I Admit Card 2020) परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर करण्यात आले आहे. या भरतीसाठी अर्ज करणारे उमेदवार अ‌ॅडमिट कार्ड कर्मचारी चयन आयोगाच्या  अधिकृत वेबसाइट ssc.nic.in वरून डाउनलोड करू शकतात. या भरतीद्वारे एकूण 4726 पदांवर उमेदवारांची निवड करण्यात येईल. (SSC CHSL tier one admit card 2020 released download from here ssc.nic.in )

12 ते 27 एप्रिल दरम्यान परीक्षा

स्टाफ सिलेक्शन कमिशनद्वारे सीएचएसएल (Combined Higher Secondary (10+2) Level) परीक्षेचं नोटिफिकेशन 06 नोव्हेंबर 2020 ला जारी करण्यात आलं होते. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 26 डिसेंबरपर्यंत सुरू होती. यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना टियर -1 आणि टियर -2 परीक्षेमध्ये सहभागी व्हावं लागणार आहे. टियर -1 परीक्षेचे अ‌ॅडमिट कार्ड स्टाफ सिलेक्शन कमिशनतर्फे वेबसाईटवर अपलोड करण्यात आलं आहे. ही परीक्षा 12 एप्रिल ते 27 एप्रिल घेण्यात येणार आहे.

 अ‌ॅडमिट कार्ड कसं डाऊनलोड करायचं?

स्टेप 1 : स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या ssc.nic.in या वेबसाईटला भेट द्या. स्टेप 2 : तिथे “STATUS / DOWNLOAD ADMIT CARD FOR COMBINED HIGHER SECONDARY LEVEL (10+2) EXAMINATION – 2020 (TIER- I) TO BE HELD FROM 12/04/2021 TO 26/04/2021” यावर क्लिक करा स्टेप 3 : नोंदणी क्रमांक आणि जन्मतारीख टाकून लॉगीन करा स्टेप 4 : अ‌ॅडमिट कार्ड ओपन होईल ते डाऊनलोड करुन प्रिंटआऊट घ्या.

निवड प्रक्रिया

Combined Higher Secondary (10+2) Level परीक्षेद्वारे लोअर डिव्हिजनल क्लार्क, ज्यूनियर सेक्रेटेरीएट असिस्टंट, पोस्टल असिस्टंट, सॉर्टिंग असिस्टंट, डाटा एंट्री ऑपरेटर्स (DEOs) पदांवर निवड केली जाणार आहे. या पदांवर निवड होण्यासाठी उमेदवारांना टियर 1, टियर 2 आणि कौशल्य चाचणी परीक्षा द्यावी लागणार आहे. टियर 1 मध्ये 100 गुणांसाठी बहूपर्यायी स्वरुपात परीक्षा होणार आहे.

संबंधित बातम्या:

GATE 2021 परीक्षेचे अ‌ॅडमिट कार्ड आले, असं कराल डाऊनलोड

CBSE Board Exam Dates 2021 | सीबीएसई बोर्ड दहावी-बारावी परीक्षांच्या तारखा जाहीर, शिक्षणमंत्र्यांची घोषणा

(SSC CHSL tier one admit card 2020 released download from here ssc.nic.in )

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.