इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेसची मुख्य परीक्षा फेब्रुवारी महिन्यात, जाणून घ्या संपूर्ण माहिती

यूपीएससीकडून आयएफएस (IFS) 2020 च्या मुख्य परिक्षेचे वेळापत्रक जारी करण्यात आले आहे. आगामी वर्षात फेब्रुवारी महिन्यात या परीक्षा घेण्यात येणार आहेत. (UPSC IFS main exam)

इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेसची मुख्य परीक्षा फेब्रुवारी महिन्यात, जाणून घ्या संपूर्ण माहिती


नवी दिल्ली : कोरोना तसेच लॉकडाऊनमुळे देशातील सर्व व्यवहार ठप्प झाले होते. मात्र, अनलॉक अंतर्गत आता सर्व व्यवहार सुरळीत होत आहेत. यूपीएससीनेही (UPSC) रखडलेल्या स्पर्धा परीक्षा घेण्याचे ठरवले आहे. त्यानुसार यूपीएससीकडून आयएफएस (IFS) 2020 च्या मुख्य परिक्षेचे वेळापत्रक जारी करण्यात आले आहे. आगामी वर्षात फेब्रुवारी महिन्यात या परीक्षा घेण्यात येणार आहेत. 28 फेब्रुवारी 2021 ते 7 मार्च 2021 या कालावधीमध्ये आयएफएस मुख्यच्या परीक्षा होतील. (UPSC IFS main 2020 exam will start from february 2021)

ज्या उमेदवारांनी आयएफएसची पूर्व परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण केलेली आहे. त्या सर्वांना ही मुख्य परीक्षा देता येईल. या परीक्षेबाबतची सर्व माहिती upsc.gov.in या वेबसाईटवर देण्यात आली आहे. वेबसाईटवर दिलेल्या माहितप्रमाणे आयएफएसची मुख्य परीक्षा दोन सत्रांत घेतली जाईल.

यामध्ये सकाळी 9 ते दुपारी 12 पर्यंत पहिले सत्र असेल, तर दुसऱ्या सत्रात दुपारी 2 ते संध्याकाळी 5 पर्यंत परीक्षा होईल. 28 फेब्रुवारी ते 7 मार्च या कालावधीत या परीक्षा होतील. आयएफएसची परीक्षा भोपाळ, चेन्नई, दिल्ली, दिसपूर (गुवाहाटी), हैदराबाद, कोलकाता, लखनऊ, नागपूर, पोर्ट ब्लेयर आणि शिमला या मुख्य शहरांत आयोजित केली जाऊ शकते. हॉल तिकीट परीक्षेच्या दोन आठवड्यांपूर्वी उपलब्ध  करुन दिले जातील.

परीक्षेसाठी हे नियम असणार

  • परीक्षेत कोणतेही इलेक्ट्रॉनिक उपकरण वापरण्यास मानाई
  • उमेदवारांजवळ मोबाईल, स्मार्टवॉच, पेनड्राईव्ह किंवा कुठलेही ब्ल्यूटूथ डिव्हाईस आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार

सबंधित बातम्या :

UPSC Civil Exam Results | यूपीएससी 2019 निकाल …

UPSC Revised Timetable | यूपीएससी

UPSC मध्ये महाराष्ट्राचा टक्का वाढला

(UPSC IFS main 2020 exam will start from february 2021)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI