UPSC Result : 410 वा क्रमांक मिळवणाऱ्या मुलीचं राहुल गांधींकडून अभिनंदन

नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) नागरी सेवा परीक्षा 2018 चा निकाल जाहीर झाला. यामध्ये केरळच्या वायनाड येथील 22 वर्षीय श्रीधन्य सुरेश हिने यूपीएससी परीक्षेत देशातून 410 वा क्रमांक मिळवला आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे वायनाड मतदारसंघातून लोकसभा लढवणार आहेत. राहुल गांधींनी ट्विटरच्या माध्यमातून श्रीधन्यला शुभेच्छा दिल्या. श्रीधन्य ही यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण करणारी …

upsc cse result 2018, UPSC Result : 410 वा क्रमांक मिळवणाऱ्या मुलीचं राहुल गांधींकडून अभिनंदन

नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) नागरी सेवा परीक्षा 2018 चा निकाल जाहीर झाला. यामध्ये केरळच्या वायनाड येथील 22 वर्षीय श्रीधन्य सुरेश हिने यूपीएससी परीक्षेत देशातून 410 वा क्रमांक मिळवला आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे वायनाड मतदारसंघातून लोकसभा लढवणार आहेत. राहुल गांधींनी ट्विटरच्या माध्यमातून श्रीधन्यला शुभेच्छा दिल्या. श्रीधन्य ही यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण करणारी केरळमधील पहिली आदिवासी समाजातील मुलगी आहे.

राहुल गांधी यांनी लिहिले, “वायनाडची श्रीधन्य सुरेश ही नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण करणारी केरळची पहिली आदिवासी मुलगी आहे. श्रीधन्यच्या कठोर परिश्रमामुळेच तिचे हे स्वप्न पूर्ण झालं. मी श्रीधन्य आणि तिच्या कुटुंबाचं अभिनंदन करतो आणि तिच्या पुढच्या भविष्यासाठी तिला शुभेच्छा देतो.”


राहुल गांधींनी गुरुवारी वायनाडच्या लोकसभेच्या जागेसाठी काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. राहुल गांधी या निवडणुकीत अमेठी लोकसभा मतदारसंघासोबतच केरळच्या वायनाड येथूनही निवडणूक लढवणार आहेत. राहुल गांधी हे अमेठीच्या जागेहून तीनदा खासदार म्हणून निवडून आले आहेत.

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) नागरी सेवा परीक्षा 2018 चा निकाल शुक्रवारी सायंकाळी  जाहीर झाला. यासाठी गेल्यावर्षी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये लिखित परीक्षा घेण्यात आल्या. तसेच अंतिम मुलाखतीही याच वर्षी फेब्रुवारी–मार्च महिन्यात घेण्यात आल्या. या परीक्षेत एकूण 759 उमेदवारांची नियुक्ती करण्यात आली आहे. यूपीएससीमध्ये यावेळी कनिष्क कटारिया याने देशातून प्रथम येण्याचा मान मिळवला. तर अक्षत जैन आणि जुनैद अहमद हे अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत. सृष्टी देशमुख ही महाराष्ट्रातून पहिली आली असून तिचा देशात पाचवा क्रमांक आहे.

यूपीएससी पहिले दहा टॉपर

  1. कनिष्क कटारिया
  2. अक्षत जैन
  3. जुनैद अहमद
  4. श्रेयांस कुमत
  5. सृष्टि जयंत देशमुख
  6. शुभम गुप्ता
  7. करनति वरुनरेड्डी
  8. वैशाली सिंह
  9. गुंजन द्विवेदी
  10. तन्मय वशिष्ठ शर्मा
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *