AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विधवा आईचा मित्र निघाला नराधम, शाळेत सोडण्याचा बहाणा केला… त्या घटनेने पुन्हा एकदा पुणे हादरले

पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जी ऐकून तुमच्या देखील पायाखालची जमीन सरकेल. ज्यामध्ये 13 वर्षीय मुलीवर भर रस्त्यात गाडीमध्ये लैंगिक अत्याचार करण्यात आला आहे.

विधवा आईचा मित्र निघाला नराधम, शाळेत सोडण्याचा बहाणा केला... त्या घटनेने पुन्हा एकदा पुणे हादरले
Image Credit source: Social media
| Updated on: Feb 20, 2026 | 4:21 PM
Share

Pune News : पुण्यात पुन्हा एकदा लैंगिक अत्याचाराची धक्कादायक घटना समोर आली आहे. शाळेत सोडण्याच्या बहाण्याने 13 वर्षीय मुलीवर तिच्याच आईच्या परिचयातील 29 वर्षीय तरुणाने अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी वारजे पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलीची आई 32 वर्षीय विधवा असून आरोपी ज्ञानेश्वर रायरीकर वय 29 हा तिचा अनेक वर्षांपासूनचा मित्र आहे. दोघांमध्ये चांगली ओळख आणि विश्वासाचे संबंध होते. याच विश्वासाच्या आधारे आईने मुलीला त्याच्यासोबत जाण्याची परवानगी दिली होती.

आईची तक्रार; पोलिसांकडून कारवाई

घटनेच्या दिवशी मुलीला शाळेत सोडण्याच्या कारणाने ज्ञानेश्वरला बोलावण्यात आले. ‘मी शाळेत सोडतो,’ असे सांगून त्याने मुलीला दुचाकीवरून डीपी रोडकडे नेले. मात्र, शाळेत न नेता भर रस्त्यात गाडी थांबवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे.

या घटनेनंतर घाबरलेल्या मुलीने आईला सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर आईने वारजे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. तक्रार मिळताच पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी ज्ञानेश्वर रायरीकर याला अटक केली. या प्रकरणी संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

समाजात संतापाची लाट

अल्पवयीन मुलीवर परिचित व्यक्तीकडून झालेल्या या अत्याचारामुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे. विश्वासाला तडा देत केलेल्या या कृत्यामुळे नागरिकांकडून कठोर शिक्षेची मागणी होत आहे. पोलिसांकडून पीडितेला आवश्यक वैद्यकीय व मदत देण्यात येत असून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.

सध्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून सध्या हे प्रकरण प्रचंड चर्चेत आलं आहे. यामुळे मित्रावर विश्वास ठेवणे देखील कठीण होत चालले आहे. पुण्यातील या संपूर्ण घटनेचा पोलीस तपास करत आहेत. त्यासोबत या घटनेमुळे अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. अशातच आता पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...