AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

I am Sorry! लिहीत सीएसएमटी स्टेशनच्या टॉयलेटमध्ये तरूणीने कापली हाताची नस…

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमधील टॉयलेटमध्ये एका तरूणीने टोकाचं पाऊल उचचल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. I am Sorry... मला माफ करा असा मेसेज लिहीत 18 वर्षांच्या त्या तरूणीने हाताची नस कापून आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला.

I am Sorry! लिहीत सीएसएमटी स्टेशनच्या टॉयलेटमध्ये तरूणीने कापली हाताची नस...
मला माफ करा.. मेसेज लिहीत तरूणीने उचललंल टोकाचं पाऊलImage Credit source: social
| Updated on: Mar 07, 2025 | 8:32 AM
Share

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमधील टॉयलेटमध्ये एका तरूणीने टोकाचं पाऊल उचचल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. I am Sorry… मला माफ करा असा मेसेज लिहीत 18 वर्षांच्या त्या तरूणीने हाताची नस कापून आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला. या तरुणीवर सेंट जॉर्ज रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती आता स्थिर असल्याचे समजते. तिला रक्तबंबाळ अवस्थेत पाहून रेल्वे स्थानकावर एकच खळबळ माजली. मात्र आजूबाजूच्या लोकांनी मदतीसाठी धाव घेत तिला लगचेच रुग्णालयात दाखल केल्याने तिच्यावर वेळीच उपचार झाले आणि तिचा जीव वाचला.

मिळालेल्या माहितीनुसार, अवघ्या 18 वर्षांची ही तरूणी गुरुवारी दुपारी 1 च्या सुमारास सीएसएमटी स्थानकातील शौचालयात गेली. तेथे जाऊन तिने धारधार शस्त्राने स्वतःला जखमी केले. हाताची नस कापून ती रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळली. तेथील लोकांना ती बाथरूममध्ये सापडली, तेव्हा तिच्या बाजूलाच I am Sorry! मला माफ करा.. असा मेसेज लिहीलेला आढळला. ही तरुणी ठाणे जिल्ह्यातील कासारवडवली येथे वास्तव्यास असल्याचे समजते.

मात्र तिने आयुष्य संपवण्याचं हे टोकाचं पाऊल का उचललं हे अद्याप समजू शकलेले नाही. लोकांच्या प्रसंगावधानामुळे तिला वेळीच रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू करण्यात आले आणि तिचा जीव वाचला. याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र ही मुलगी कोण, ती ती काय करते आणि तिने आत्महत्या करण्याचं हे टोकाचं पाऊल का उचललं याचा अद्याप उलगडा होऊ शकलेला नाही. सध्या तिच्यावर सेंट जॉर्ज रुग्णालयात उपचार सुरू असून प्रकृती स्थिर असल्याचे समजते.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.