मी रियाला ठार मारलंय… या आणि पाहा… त्याचा फोन येताच सर्वच थरथरले; काय घडलं? कुणी घडवलं?

तो आला... तिला मारलं... रक्त बंबाळ झालेल्या लेकीच्या आईला म्हणाला या आणि पाहा..., नक्की काय आणि कसं घडलं... धक्कादायक आहे प्रकरण..., या प्रकरणी पोलिसांची अधिक चौकशी सुरु....

मी रियाला ठार मारलंय... या आणि पाहा... त्याचा फोन येताच सर्वच थरथरले; काय घडलं? कुणी घडवलं?
| Updated on: Oct 15, 2025 | 11:38 AM

मुलगी बाहेर जाते आणि थोड्याच वेळात कळतं तिची हत्या करण्यात आली आहे.. सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे आरोपी स्वतः मुलीच्या आईला सांगतो ‘मी तुमच्या मुलीला मारलंय… या आणि पाहा…’, अशात आई तात्काळ घटनास्थळी पोहोचते आणि रक्त बंबाळ अवस्थेत मुलीला पाहिल्यानंतर आईला मोठा धक्का बसतो… पण त्याने मुलीची हत्या का केली असेल असा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेल… तर जाणून घ्या रिया हिच्यासोबत त्या दिवशी नक्की काय झालं आणि का झालं?

सोमवारी सकाळी दिल्लीतील नंद नगरी परिसरात एक घटना घडली, ज्यामुळे संपूर्ण परिसर हादरून गेला. दिवसाची सुरुवाच होतात, रस्त्याच्यामध्ये रक्त बंबाळ अवस्थेत असलेल्या तरुणीचा मृतहेद आढळतो आणि परिसरात एकच खळबळ माजते. तरुणीचं नाव रिया असून ती फक्त 20 वर्षांची होती. ज्याने रिया हिची हत्या केली तो कोणी अज्ञात नव्हता. 23 वर्षांचा आकाश होता… पुढे काय झालं?

रिया हिचे वडील मुन्ना सफाई कर्मचारी आहे… सकाळी रिायचे वडील नोहमीप्रमाणे कामासाठी गेले आणि आई घरच्या कामांत व्यस्त झाली. रिया आईला म्हणाली, ‘मी समोसे घेण्यासाठी जात आहे..’ आणि रिया घरातून निघाली, ती पुन्हा घरी आलीच नाही… अखेर काही मिनिटांनंतर रियाच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला.

12 पेक्षा जास्त वार…

9.50 च्या सुमारास, रिया नंद नगरीच्या डी-ब्लॉकवर पोहोचली होती तेव्हा आकाश समोरून आला. दोघांमध्ये काही बोलणं देखील झालं. तेव्हा आकाश याने जवळ असलेला चाकू काढला आणि रिया हिच्या जवळपास 12 पेक्षा जास्त वार केले. ज्यामुळे जागीच रिया हिच निधन झालं. आजूबाजूच्या लोकांना काही कळतं तेवढ्यात रक्त बंबाळ अवस्थेत रिया रस्त्यावर पडते.

रिया हिला मारल्यानंतर आरोपी फरार होतो. लेकीची हत्या झाली आहे हे कळताच आई पिंकी देवीची घटनास्थळी धावते. पिंकी देवी यांनी सांगितल्यानुसार, आरोपी आकाश त्यांच्या घरी आला होता आणि म्हणाला, “मी रियाला मारलं आहे.”, त्यानंतर रिया हिला जीटीबी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण तोपर्यंत उशीर झालेला. डॉक्टरांनी रिया हिला मृत घोषित केलं.

रिया हिला आकाश द्यायचा त्रास…

वडील मुन्ना यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचे आजी – आजोब शेजारी राहात होते. आधी तो त्रिलोकपुरी येथे राहायचा. पण काही महिन्यांपूर्वी त्याच्या आजी – आजोबांकडे आला. रियाने दीड महिन्यापूर्वी सांगितलं होतं की आकाश तिला सतत त्रास देत होता. अखेर आकाश याने तिची हत्या केली. पोलीस आता रिया हत्या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.