AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेजारच्या आजोबांनी ल्युडो खेळायचं आमिष दाखवलं, नंतर किळसवाणं कृत्य, अल्पवयीन मुलींसोबत संतापजनक प्रकार

ल्युडो खेळण्याचे आमिष दाखवून 55 वर्षीय आरोपीने दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार नागपूरमध्ये उघडकीस आला आहे (55 year old man molest ten to twelve year old two minor girls in Nagpur)

शेजारच्या आजोबांनी ल्युडो खेळायचं आमिष दाखवलं, नंतर किळसवाणं कृत्य, अल्पवयीन मुलींसोबत संतापजनक प्रकार
सूरत बलात्कार व हत्या प्रकरण: आरोपी नराधमाला फाशीची शिक्षा
| Edited By: | Updated on: May 21, 2021 | 12:02 PM
Share

नागपूर : ल्युडो खेळण्याचे आमिष दाखवून 55 वर्षीय आरोपीने दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार नागपूरमध्ये उघडकीस आला आहे. आरोपीने मुलींच्या तोंडावर आणि डोळ्यांवर कापड बांधून अत्याचार केल्याचं समोर आलं आहे. नागपूरच्या कळमना पोलिसांनी आरोपी डोलचंद चव्हाण यास अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस चौकशी करत आहेत (55 year old man molest ten to twelve year old two minor girls in Nagpur).

पीडितांचे आई-वडील मजूर

आरोपी चव्हाणच्या शेजारी 12 आणि 10 वर्षांच्या दोन पीडित मुली राहतात. त्यांचे आई-वडील मजुरी करतात. मुली घरासमोर खेळत होत्या. त्याचवेळी चव्हाण तिथे आला. त्याने मुलींना ल्युडो खेळण्याचे आमिष दाखविले. दोन्ही मुली त्याला आजोबा म्हणून हाक देतात. यामुळे त्याच विश्वासाने त्या त्याच्यासोबत ल्युडो खेळायला तयार झाल्या (55 year old man molest ten to twelve year old two minor girls in Nagpur).

आरोपी मुलींना बळजबरी करु लागला

आरोपी डोलचंद चव्हाणच्या घराच्या बाजूलाच एक टिनाचे शेड आहे. चव्हाण दोन्ही मुलींना तिथे घेऊन गेला. त्याने दोन्ही मुलींच्या तोंडाला कापड बांधले. त्यानंतर त्याने मुलींच्या डोळ्यांवरही कापड बांधायला लावले. मुलींनीही तसेच केले. यानंतर चव्हाण एका मुलीशी बळजबरी करू लागला. तोंडावर कापड बांधला असल्याने ती ओरडू शकली नाही.

परिसरातील नागरिकांकडून आरोपीची धुलाई

दरम्यान, शेजारून जाणाऱ्या एका व्यक्तीला टिनाच्या आतून आपत्तीजनक आवाज ऐकू आला. त्याने दरवाजा उघडून पाहिला असता, चव्हाण आपत्तीजनक अवस्थेत होता. संबंधित व्यक्तीने परिसरातील लोकांना घटनेची माहिती दिली. परिसरातील नागरिकांनी चव्हाणची धुलाई केली. चव्हाण तेथून पळाला. मुलीच्या नातेवाईकांनी कळमना पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. पोलिसांनी बलात्कार तथा पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी डोलचंद चव्हाणला अटक केली.

हेही वाचा : 28 वर्षीय पत्नीसह एक वर्षाच्या मुलाची हत्या, पुण्यात पतीची गळफास घेऊन आत्महत्या

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.