आईच्या भेटीसाठी गेला, रात्री मुक्कामाला थांबला, पण घरातच डोकं ठेचून हत्या, हत्येमागचं गूढ नेमकं काय?

जळगावात आज (13 सप्टेंबर) पहाटे एक खुनाची घटना समोर आली आहे. जुने जळगावातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भवन समोर राहणाऱ्या एका 55 वर्षीय व्यक्तीचं डोकं ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली आहे.

आईच्या भेटीसाठी गेला, रात्री मुक्कामाला थांबला, पण घरातच डोकं ठेचून हत्या, हत्येमागचं गूढ नेमकं काय?
आईच्या भेटीसाठी गेला, रात्री मुक्कामाला थांबला, पण घरातच डोकं ठेचून हत्या, हत्येमागचं गूढ नेमकं काय?


जळगाव : जळगावात आज (13 सप्टेंबर) पहाटे एक खुनाची घटना समोर आली आहे. जुने जळगावातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भवन समोर राहणाऱ्या एका 55 वर्षीय व्यक्तीचं डोकं ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. हत्येमागे नेमकं कारण काय? ते अद्याप समजू शकलेलं नाही. पण या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. पण अजूनतरी हत्येमागील नेमकं कारण काय? ते समजू शकलेलं नाही.

आईच्या भेटीसाठी गेला, रात्रभर मुक्काम

जुना जळगाव परिसरात असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भवन समोर राहणारे 55 वर्षीय राजू सोनवणे यांचा 30 वर्षांपूर्वी रजिया सोनवणे यांच्याशी विवाह झाला होता. 15 वर्षांपासून दोन्ही पती-पत्नी आणि 2 मुले लक्ष्मी नगरात स्थायिक झाले आहेत. राजू सोनवणे हे रिक्षा चालक होते. पण गेल्या काही दिवसांपासून ते घरीच होते. आंबेडकर वाड्यासमोर राजू सोनवणे यांची आई आणि पुतण्या राहत असल्याने ते त्यांना भेटायला येत असत. ते रविवारी (12 सप्टेंबर) रात्री देखील आईला भेटायला आले आणि रात्री तिथेच थांबले.

घटना कशी उघडकीस आली?

रात्री राजू यांची आई द्रुपदाबाई आणि पुतण्या विशाल अनिल सोनवणे असे घरी होते. राजू सोनवणे रात्री घराच्या वरील मजल्यावर झोपायला गेले तर आई आणि पुतण्या खालील खोलीत झोपले होते. दरम्यान आज सकाळी साडेआठ वाजले तरी राजू खाली न आल्याने त्यांच्या आईने मुलाला वर पाठविले. यावेळी घडलेला सर्व प्रकार लक्षात आला.

पोलिसांचा तपास सुरु

राजू सोनवणे यांचं डोकं ठेचून हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली. राजू यांच्या आईला याबाबत माहिती कळताच त्यांनी टाहो फोडला. त्यांचा आक्रोश बघून परिसरातील इतर नागरिकांच्याही डोळ्यात पाणी आलं. राजू यांची अशाप्रकारे कोण हत्या करु शकतं? असा सवाल अनेकांना सतावत आहे. दरम्यान, संबंधित घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तातडीने तिथे जावून घटनास्थळाचा पंचनामा केला. त्यानंतर राजू यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. पण सध्या तरी हत्येमागील नेमकं कारण समोर आलेलं नाही.

नागपुरात सलग दोन दिवसात दोन हत्येच्या घटना

दुसरीकडे नागपुरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. गेल्या सलग दोन दिवसांमध्ये हत्येच्या दोन घटना घडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दारु पिण्याच्या वादातून चुलत भावानेच तरुणाची हत्या केल्याची घटना नागपुरात ताजी असताना दुसऱ्याच दिवशी वर्चस्व वादातून एकाची हत्या झाल्याचा प्रकार समोर येत आहे.

रविवारी रात्री नागपुरात वर्चस्वाच्या वादातून तिघांनी एका युवकाची गळा चिरून हत्या केल्याची घटना घडली आहे. यशोधरा नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिवळी नदी जवळ असलेल्या गणेश भोजनालयाच्या समोर हे हत्याकांड घडलं. आवेश खान पठाण असे खून झालेल्या युवकाचं नाव असून तीनही मारेकरी फरार झाले आहेत.

हेही वाचा :

नागपुरात तरुणाची गळा चिरून हत्या, यशोधरा नगरात सलग दुसऱ्या दिवशी खुनाची घटना

एकतर्फी प्रेमातून शिवीगाळ, पोलिसात तक्रार केल्याने चाकूहल्ला, 20 वर्षीय तरुणीचा मृत्यू

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI