मदतीऐवजी लोक मोबाईलवर व्हिडीओ काढण्यात मग्न, वृद्धाने पुराच्या पाण्यात जीव गमावला

नांदेडमध्ये शनिवारी (12 जून) सांयकाळी पुराच्या पाण्यात वाहून वृद्धाचा मृत्यू झाला (65 year old man death due to flood in Nanded).

मदतीऐवजी लोक मोबाईलवर व्हिडीओ काढण्यात मग्न, वृद्धाने पुराच्या पाण्यात जीव गमावला
पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने वृद्धाचा मृत्यू
Follow us
| Updated on: Jun 13, 2021 | 6:58 PM

नांदेड : नांदेडमध्ये शनिवारी (12 जून) सांयकाळी पुराच्या पाण्यात वाहून वृद्धाचा मृत्यू झाला. मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खतगांवमध्ये ही घटना घडली. गावातील 65 वर्षीय विठ्ठल माने हे शेळ्या चारण्यासाठी गावाच्या बाहेर गेले होते. सायंकाळच्या सुमारास पाऊस आल्याने विठ्ठल माने हे घराकडे निघाले होते. यावेळी पुलावरून येत असताना माने हे वाहुन गेले (65 year old man death due to flood in Nanded).

सरकारने मृतकांच्या कुटुंबियांना मदत करावी, गावकऱ्यांची मागणी

विशेष म्हणजे वृद्ध पुलावरून जात असताना अनेकांनी संबंधित घटना मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केली. मात्र वृद्धाच्या मदतीसाठी कुणीही धावले नाही. या घटनेनंतर गावावर शोककळा पसरलीय. मुक्रमाबाद पोलिसांनी या घटनेचा पंचनामा केला. तसेच गावच्या सरपंचांनी मयताच्या कुटुंबाला सरकारने आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे. तसेच गावकऱ्यांनी गावाशेजारी असलेल्या या पुलाची उंची वाढवण्याची मागणी केलीय (65 year old man death due to flood in Nanded).

माणुसकी शिल्लक आहे का? 

दरम्यान, हातात आलेल्या मोबाईलमुळे लोक मदत करण्याऐवजी घटनेचे चित्रीकरण करण्यात व्यस्त झाल्याने माणुसकी हरवली की काय? अशी शंका निर्माण होतेय. एखाद्याला वाचवण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी मृत्यूचे असे चित्रीकरण करून काय साध्य होणार? असाही सवाल या निमित्ताने उपस्थित होतोय.

औरंगाबादमध्येही दोन जण पुरात वाहून गेले, सुदैवाने प्राण वाचले

दोन दिवसांपूर्वी औरंगाबादेतही दोन जण पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना समोर आली होती. औरंगाबादच्या फुलंब्री तालुक्यातील पानवडोद गावातील दोन तरुणांना पुराच्या पाण्यात दुचाकी घालणे महागात पडले होते. हे दोघेही तरुण दुचाकीसह पुरात गेले वाहून गेले. तुफान आलेल्या पुरात नदीच्या पुलावरुन दुचाकी घालणे तरुणांना चांगलंच महागात पडलं. मात्र सुदैवाने वाहून जाणाऱ्या दोन्ही तरुणांचे प्राण वाचले आहेत. फुलंब्री तालुक्यातील फुलमस्ता नदीच्या पुलावर ही धक्कादायक घटना घडली होती. नदीला पूर आलेला दिसतोय. पाण्याचा वेग आणि पातळी मोठी होती. मात्र तरुणांनी अतिआत्मविश्वासाने नदीच्या पुलावर गाडी घातली. मात्र पाण्याला वेग जास्त असल्याने तरुण दुचाकीसह पुराच्या पाण्यात वाहून गेले. मात्र त्या दोन तरुणांचे सुदैवाने प्राण बचावले. दुचाकीसह तरुण पुराच्या पाण्यात वाहून जातानाचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे.

हेही वाचा : नाना पटोले यांना मुख्यमंत्री व्हायचंय? विजय वडेट्टीवार काय म्हणाले? राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेला काय वाटतं?

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.