Nalasopara Girl Death : नालासोपाऱ्यात नाल्यात पडून 15 वर्षांची मुलगी वाहून गेली, अग्नीशमन दलाकडून शोध सुरु

दीक्षा यादव ही मुलगी मंगळवारी दुपारी 1 च्या सुमारास बाथरुमला जात होती. यावेळी तिचा पाय घसरला आणि ती नाल्यात पडली. नाल्याच्या प्रवाहात मुलगी वाहून गेली.

Nalasopara Girl Death : नालासोपाऱ्यात नाल्यात पडून 15 वर्षांची मुलगी वाहून गेली, अग्नीशमन दलाकडून शोध सुरु
नालासोपाऱ्यात नाल्यात पडून 15 वर्षांची मुलगी वाहून गेली
Image Credit source: TV9
विजय गायकवाड

| Edited By: वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

Aug 17, 2022 | 2:52 AM

नालासोपारा : बाथरुमला जात असताना पाय घसरुन नाल्या (Drain)त पडून 15 वर्षाची मुलगी वाहून (Swept Away) गेल्याची दुर्दैवी घटना नालासोपारा पूर्वेला घडली आहे. दीक्षा यादव असे वाहून गेलेल्या मुलीचे नाव आहे. नालासोपारा पूर्व धानीव बाग नाका येथे मंगळवारी दुपारी ही घटना घडली. राञी उशीरापर्यंत वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दला (Fire Brigade)चे जवान आणि पोलिसांनी शोध घेतला, पण मुलीचा शोध अद्यापही लागला नाही. धानीव बाग येथे दोन बैठ्या चाळींमध्ये 200 ते 300 फूट लांबीचा मोठा नाला आहे. हा नाला काही ठिकाणी खुला तर काही ठिकाणी बंदीस्थ आहे. सध्या पावसाळा सुरु असल्याने कमरेपर्यंत या नाल्यात पाणी आहे.

बाथरुमला जाताना पाय घसरुन नाल्यात पडली

दीक्षा यादव ही मुलगी मंगळवारी दुपारी 1 च्या सुमारास बाथरुमला जात होती. यावेळी तिचा पाय घसरला आणि ती नाल्यात पडली. नाल्याच्या प्रवाहात मुलगी वाहून गेली. आज दिवसभर वसई विरार नालासोपाऱ्यात रिमझिम पावसासह अधूनमधून जोरदार पाऊस असल्याने नाल्यात पाण्याचा प्रवाह वाढला होता. या घटनेची माहिती तात्काळ पेल्हार पोलीस आणि अग्निशमन दलाला देण्यात आली. माहिती मिळताच पोलीस आणि अग्नीशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत मुलीचा शोध सुरु केला. मात्र राञी उशिरापर्यंत दिक्षाचा शोध लागला नाही.

विरारमध्ये दहावीच्या विद्यार्थिनीचा शॉक लागून मृत्यू

क्लासवरून घरी जाताना दहावीत शिकणाऱ्या मुलीचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना मंगळावारी विरारमध्ये घडली आहे. विरार पश्चिमेकडील बोळींजच्या कृष्णा मथुरा नगर येथील एब्रोल सोसायटीच्या समोर मंगळवारी सायंकाळी 5 च्या सुमारास ही घटना घडली. तनिष्का लक्ष्मण कांबळे (15) असे मयत विद्यार्थिनीचे नाव आहे. आज दिवसभर वसई विरारमध्ये रिमझिम पाऊस पडत असल्याने सासोयटीच्या समोरच्या रस्त्यावर पाणी साचलं होतं. त्या पाण्यात रस्त्याच्या खाली असलेली एम.एस.ई.बी.ची केबल ब्रेक झाल्याने, पाण्यात विजेचा प्रवाह चालू होता. त्याच पाण्यातून जाताना तरुणीला विजेच्या करंट लागून तिचा दुर्देवी मृत्यू झाल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. (A 15 year old girl was swept away after falling into a drainage in Nalasopara)

हे सुद्धा वाचा


Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें