सिग्नल तोडून पळत होता कारचालक, अडवायला गेलेल्या वाहतूक पोलिसाला बोनेटवर दीड किमी फरफरटत नेले

कार चालक सावेश सिद्दीकी याच्याकडे वाहन चालवण्याचे लायसन्स नसताना सिग्नल तोडून, भरगाव वेगात कार चालवत वाहतुकीला अडथळा निर्माण करीत जात होता. तेथील कर्तव्यावरील पोलीस हवालदार चौधरी यांनी हात दाखवून कार थांबविण्याचा प्रयत्न केला.

सिग्नल तोडून पळत होता कारचालक, अडवायला गेलेल्या वाहतूक पोलिसाला बोनेटवर दीड किमी फरफरटत नेले
वसईत कारचालकाने वाहतूक पोलिसाला फरफटत नेलेImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Feb 13, 2023 | 9:41 PM

वसई / विजय गायकवाड (प्रतिनिधी) : सिग्नल तोडून भरगाव वेगात पळणाऱ्या कारचालकाला अडविण्यासाठी गेलेल्या वाहतूक पोलिसांच्या अंगावर कार घालून, कारच्या बोनेटवरच दीड किलोमीटर फरफटत नेल्याची धक्कादायक घटना वसईत घडली. वसईतील एव्हरशाईन सिग्नलवर रविवारी रात्री पावणे आठ वाजता ही घटना घडली आहे. या घटनेत वाहतूक पोलीस सुदैवाने वाचले असून, किरकोळ जखमी झाले आहेत. याबाबत आरोपीविरोधात वसईच्या माणिकपूर पोलीस ठाण्यात भादवी कलम 353, 307, 308, मोटर वाहन कायदा 5/180, 3/181 (1), 184, 179 (1), 239, 177 प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. अटक आरोपीला वसई न्यायालयात हजर केले असता 16 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याचे माणिकपूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संपतराव पाटील यांनी सांगितले.

सावेश जफ्फर सिद्दीकी असे 21 वर्षीय आरोपीचे नाव असून, हा वसई पूर्व गोलानी नाका येथील राहणारा आहे. तर सोमनाथ कचरू चौधरी असे तक्रारदार वाहतूक पोलीस हवालदाराचे नाव आहे.

वसंत नगरी सिग्नलवरील घटना

वसई पूर्व वसंत नगरी सिग्नलवर सोमनाथ चौधरी हे रविवारी आपले कर्तव्य बजावत होते. यावेळी रात्री पावणे आठच्या सुमारास हुंडाई कंपनीची पांढऱ्या रंगाची कार सिग्नल तोडून पळत होती.

हे सुद्धा वाचा

भरधाव वेगात कार चालवत वाहतुकीला अडथळा करत होता

कार चालक सावेश सिद्दीकी याच्याकडे वाहन चालवण्याचे लायसन्स नसताना सिग्नल तोडून, भरगाव वेगात कार चालवत वाहतुकीला अडथळा निर्माण करीत जात होता. तेथील कर्तव्यावरील पोलीस हवालदार चौधरी यांनी हात दाखवून कार थांबविण्याचा प्रयत्न केला.

अडवण्याचा प्रयत्न केल्याने वाहतूक पोलिसाला फरफटत नेले

मात्र त्यांच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करून सिद्दीकी याने शासकीय कामात अडथळा निर्माण केला. तसेच स्वतः वाहतूक पोलीस कार समोर गेला असता त्यांना कारच्या बोनेटवरच घेऊन चक्क वसंत नगरी सर्कल ते रेंज नाकापर्यंत दीड किलोमीटरपर्यंत फरफटत नेत जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

शेवटी काही जागरूक वाहनधारकांनी भरगाव वेगात जाणाऱ्या कारच्या समोर आडवे वाहन लावून कार थांबवली. कारचालकाला ताब्यात घेत त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

Non Stop LIVE Update
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा.
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला.
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर.
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य.
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'.
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका.
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.