AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांच्यावर गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण ?

नेहमी कोणत्या ना कोणत्या वादात अडकणाऱ्या दिग्दर्शक रामगोपाल वर्मा यांच्यावर अखेर बदनामी केल्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांच्यावर गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण ?
ram gopal varma
| Updated on: Nov 12, 2024 | 5:11 PM
Share

सत्या, रंगीला आणि कंपनी यांसारखे सुपरहीट चित्रपट काढणारे दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांच्या गुन्हा दाखल झाला आहे. राम गोपाल वर्मा यांनी अलिकडे सोशल मिडीयावर केलेल्या पोस्टमुळे वाद ओढावून घेतला आहे. मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या आणि त्यांच्या कुटुंबासंदर्भात सोशल मिडीयावर आपत्तीजनक पोस्ट केल्या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि त्यांचा मुलगा नारा लोकेश यांच्यासह टीडीपी नेते आणि जनसेना पार्टीचे प्रमुख उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मॉर्फ्ड फोटो सोशल मिडीयावर शेअर केल्या प्रकरणात राम गोपाल वर्मा यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

आंध्रप्रदेशात केस दाखल

टीडीपी पार्टीचे नेते रामलिंगम यांनी प्रकाशम जिल्ह्यातील मद्दिपडू पोलिस ठाण्यात रामगोपाल वर्मा यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. राम गोपाल वर्मा यांच्या वर आरोप आहे की त्यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, त्यांचा मुलगा लोकेश आणि सून ब्राह्मिनी सह परिवाराला टार्गेट करीत अपमानजनक मजकूर सोशल मिडीयावर शेअर केला. रामलिंगम यांनी रामगोपाल वर्मा यांच्या पोस्टमुळे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि त्यांचे उपमुख्यमंत्री तसेच कुटुंबियांची बदनामी झाली आहे असा आरोप केला आहे. प्रकाशम जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक ए.आर.दामोदर यांनी या प्रकरणात आयटी कायद्यानुसार गुन्हा दाखल केल्याचे म्हटले आहे.

चंद्राबाबूंवर टीका

राम गोपाल वर्मा हे वायएसआर कॉंग्रेस पार्टीशी जवळीक राहण्यासाठी चंद्राबाबूंवर वारंवार टीका करीत आहेत असा आरोप त्यांच्यावर होत आहे. त्यांचा चित्रपट ‘लक्क्षी एनटीआर’ हा टीडीपीचे संस्थापक आणि माजी मुख्यमंत्री एनटी रामाराव यांच्या जीवनावर आधारित होता. हा चित्रपट लक्ष्मी पार्वती यांच्या एनटीआर यांचा रोमांन्स आणि लग्न या विषयावर आधारित होता. या चित्रपटात एनटीआरच्या राजकीय घसरणीत चंद्राबाबूंची भूमिकेला निगेटीव्ह सादर केले आहे.साल 1995 मध्ये एनटीआरचे जावई चंद्राबाबू नायडू यांनी पार्टी गटबाजी करून एनटीआरना पार्टीतून बाहेर काढत स्वत:ते मुख्यमंत्री बनले या घटनेचा चित्रपटातील कहानीत टळक उल्लेख केलेला आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.