AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिल्ली विमानतळावर सीमा शुल्क विभागाची मोठी कारवाई, ‘एवढ्या’ किंमतीची घड्याळे जप्त

सीमाशुल्क विभागाने या घड्याळाच्या तस्करीप्रकरणी गुन्हा दाखल करून यामागील मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी तपासाच्या कक्षा आणखी वाढवल्या आहेत.

दिल्ली विमानतळावर सीमा शुल्क विभागाची मोठी कारवाई, 'एवढ्या' किंमतीची घड्याळे जप्त
दिल्ली विमानतळावर सीमा शुल्क विभागाची मोठी कारवाईImage Credit source: TV9
| Updated on: Oct 06, 2022 | 11:49 PM
Share

नवी दिल्ली : राजधानी नवी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Indira Gandhi International Airport) महागड्या घड्याळांची मोठी तस्करी उघडकीस आली आहे. सीमा शुल्क विभागाच्या (Customs Department) एका पथकाने कोट्यवधी रुपयांची महागडी घड्याळे जप्त (Expensive watches confiscated) केली आहेत. या हिरेजडित घड्याळांची संख्या अवघी सात आहे. मात्र त्यांची किंमत ऐकून कोणालाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.जप्त केलेल्या सात घड्याळांची किंमत तब्बल 28 कोटींच्या घरात आहे.

भारतीय नागरिक अटकेत

सीमाशुल्क विभागाने या घड्याळाच्या तस्करीप्रकरणी गुन्हा दाखल करून यामागील मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी तपासाच्या कक्षा आणखी वाढवल्या आहेत. आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल नंबर-3 वर ही कारवाई करण्यात आली.या कारवाईत सीमाशुल्क विभागाने एका भारतीय नागरिकाला अटक केली आहे.

दुबईतून आलेल्या विमानातून तस्करी

दुबईहून नवी दिल्लीत आलेल्या विमानाच्या लँडिंगनंतर सीमा शुल्क विभागाला काही प्रवाशांच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. त्यांची झडती घेतली असता एका प्रवाशाकडे महागडी घड्याळे आढळून आली. तसेच हिरेजडीत ब्रेसलेटही जप्त करण्यात आले आहे.

जप्त केलेल्या घड्याळांची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत तब्बल 28 कोटी 17 लाख 97 हजार 864 रुपये असल्याची माहिती समोर आली आहे.

कलम 110 अन्वये जप्तीची कारवाई

सीमाशुल्क कायद्याच्या 1962 च्या कलम 110 अन्वये जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. तसेच याच कायद्यात कलम 104 अन्वये आरोपी बनवून एका भारतीय नागरिकाला अटक करण्यात आली आहे. राजधानी दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर दीर्घकाळानंतर तस्करीविरोधात केलेली ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे.

रॅकेटच्या सूत्रधाराचा शोध सुरू

अटक केलेला आरोपीला भारतातील तसेच विदेशातील आणखी किती लोकांची साथ आहे? या रॅकेटचा नेमका सूत्रधार कोण? रॅकेटमध्ये नेमके किती लोक सहभागी आहेत? याची उकल करण्यासाठी सीमाशुल्क विभागाचे अधिकारी सध्या आरोपीची कसून चौकशी करत आहेत.

राजधानी नवी दिल्लीमध्ये सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडेकोट असतानाही एवढ्या मोठ्या प्रमाणावर महागड्या घड्याळांच्या तस्करीचे धाडस करण्यात आले. त्यामुळे सीमा शुल्क विभागासह इतर सुरक्षा यंत्रणाही चक्रावून गेल्या आहेत.

देशभरात जाळे पसरविण्याचा होता कट

विदेशातून तस्करी करण्यात आलेली महागडी घड्याळे दिल्लीमार्गे देशभरात पाठविली जाण्याचे प्लॅनिंग होते. दिल्ली विमानतळावर घड्याळ तस्करीचा कट यशस्वी झाला असता तर इतर प्रमुख विमानतळांवर अशा प्रकारची तस्करी करण्यात आली असती, असा संशय सीमा शुल्क विभागाला आला आहे. त्या अनुषंगाने देशातील इतर विमानतळांवर अलर्ट जारी करण्यात आला आहे.

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.