AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकाच घरात 5 जणांचे मृतदेह सापडले… लहान मुलांचाही समावेश, अख्खं गावच हादरलं; काय घडलं त्या चार भिंतीत

एक धक्कादायक प्रकारण समोर आले आहे. एकाच कुटुंबातील 5 जाणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर संपूर्ण गाव हादरले आहे. एक रात्रीत नेमकं काय घडलं? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. जाणून घ्या संपूर्ण प्रकरण सविस्तर...

एकाच घरात 5 जणांचे मृतदेह सापडले... लहान मुलांचाही समावेश, अख्खं गावच हादरलं; काय घडलं त्या चार भिंतीत
CrimeImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Nov 14, 2025 | 3:34 PM
Share

एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने संपूर्ण गाव हादरुन गेले आहे. एका रात्रीत असे काय घडले की एकाच घरात पती-पत्नी आणि त्यांच्या तीन अल्पवयीन मुलांचे मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण गावात दहशत पसरली आहे. नेमकं काय झालं होतं चला जाणून घेऊया…

कुठे घडली घटना?

उत्तर प्रदेशातील श्रावस्ती जिल्ह्यातील इकौना परिसरातील कैलाशपूर (मनिहारपुरवा) गावात शुक्रवारी ही घटना घडली. एकाच घरात पती-पत्नी आणि त्यांच्या तीन अल्पवयीन मुलांचे मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण गावात दहशत पसरली आहे. मृतांमध्ये रोज अली (वय ३५), त्यांची पत्नी शहनाज (वय ३२), मोठी मुलगी गुलनाज (वय ११), दुसरी मुलगी तबस्सुम (वय १०) आणि दीड वर्षांचा मुलगा मोईन यांचा समावेश आहे. हे कुटुंब मुंबईत राहायचे आणि पाच दिवसांपूर्वीच गावी आले होते.

बहिणीने दिली प्रतिक्रिया

रोज अलीची बहीण रुबीना हिने सांगितले, “रात्री सर्व काही अगदी सामान्य होते. सकाळी दरवाजा उघडला नाही, म्हणून वाजवला. खिडकीतून डोकावून पाहिलं तर पाचही जण खोलीत निपचित पडलेले दिसले.” त्यानंतर गावकऱ्यांनी एकत्र येऊन दरवाजा तोडला आणि आतला भयानक देखावा समोर आला. घटनेची माहिती मिळताच इकौना पोलीस, डॉग स्क्वॉड आणि फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले. घर सील करण्यात आले असून सखोल तपास सुरू आहे. पोलीस अधीक्षक राहुल भाटी आणि अपर पोलीस अधीक्षक मुकेश चंद्र उत्तम यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. विषबाधा, गॅस गळती किंवा अन्य काही कारण असू शकते, अशी प्राथमिक शक्यता व्यक्त केली जात आहे. पाचही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून, पोस्टमार्टम अहवाल आल्यानंतरच खरे कारण समजू शकेल, असे पोलिसांनी सांगितले. या दुर्दैवी घटनेमुळे गावात शोककळा पसरली असून, लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.