प्रेयसीचे दोघांसोबत… प्रियकराला कळताच उचलले टोकाचे पाऊल, पोलिसही हादरले
एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एका प्रियकराला त्याच्या प्रेयसीचे दोघांसोबत अफेअर असल्याचे कळाले. त्यानंतर त्याने टोकाचे पाऊल उचलले. ते पाहून पोलिसही हादरे. नेमकं प्रकरण काय? चला जाणून घेऊया...

एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका गावातील ३५ वर्षीय तरुणाने आपली प्रेयसी आणि तिच्या दोन वर्षांच्या मुलीची हत्या केली आणि नंतर स्वतःचा गळा रेतून आत्महत्या केली. पोलिसांचे म्हणणे आहे की, हे मर्डर-सुसाइड (हत्या आणि आत्महत्या) प्रकरण आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण गावात खळबळ माजली आहे. तसेच आत्महत्येपूर्वी तरुणाने 8 पानांची सुसाईट नोट लिहिली आहे. आता नेमकं प्रकरण काय आहे? चला जाणून घेऊया
नेमकं प्रकरण काय?
गुजरातमधील अहमदाबाद जिल्ह्यातील सनंद तालुक्यातील लोदारियार गावातील हे धक्कादायक प्रकरण आहे. पोलिसांच्या मते, मृत तरुणाची ओळख रणछोड परमार अशी आहे. तो एका खासगी कंपनीत नोकरी करत होता. तो सुमारे २० दिवसांपासून लोदारियार गावात भाड्याच्या घरात राहत होता. रणछोड विवाहित होता आणि त्याच्या पत्नीपासून वेगळे राहण्याचा खटला (अलिमनी केस) कोर्टात सुरू होता. दरम्यान, ज्या महिलेशी त्याचे प्रेमसंबंध होते, ती आधीच विवाहित होती आणि तिला दोन वर्षांची मुलगी होती. शुक्रवारी ती महिला आपल्या मुलीसह रणछोडच्या भाड्याच्या घरी आली होती. त्याच रात्री उशिरा तिघांचेही मृतदेह खोलीत रक्ताने माखलेल्या अवस्थेत आढळले. तिघांचेही गळे तीक्ष्ण हत्याराने कापले गेले होते.
वाचा: हिचे क्लिवेज बघ किती डिप; गायिकेने सांगितला पुण्यातल्या बालरोगतज्ज्ञासोबतचा वाईट अनुभव
8 पानांची सुसाइड नोट
एका अहवालानुसार, पोलिसांना घटनास्थळावरून 8 पानांची सुसाइड नोट मिळाली आहे. यामध्ये रणछोडने संपूर्ण घटनेचा तपशील लिहिला आहे. नोटमध्ये त्याने लिहिले आहे की, तो मानसिकदृष्ट्या त्रस्त होता कारण त्याच्या प्रेयसीचे दुसऱ्या व्यक्तीशीही संबंध होते. त्या व्यक्तीने त्याला सतत धमक्या दिल्या होत्या आणि यामुळे तो तणाव व अपमान सहन करू शकत नव्हता. या रागाच्या आणि मानसिक दबावाच्या भरात त्याने प्रथम आपली प्रेयसी आणि तिच्या मुलीची हत्या केली. नंतर स्वतःचा गळा रेतून आत्महत्या केली.
पोलिसांचा तपास सुरू
एक वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने या प्रकरणाबाबत बोलताना सांगितले की, “प्राथमिक तपास आणि सुसाइड नोटवरून हे स्पष्ट आहे की रणछोड परमार याने प्रथम महिला आणि तिच्या मुलीची हत्या केली. नंतर स्वतःला संपवले. तिघांचाही मृत्यू गळ्यावरील खोल जखमांमुळे झाला आहे.” पोलिसांनी सुसाइड नोट जप्त केली आहे आणि त्यातील हस्ताक्षराची तपासणी केली जात आहे. तसेच, नोटमध्ये उल्लेखलेल्या धमक्यांचीही चौकशी केली जात आहे.
