तलावाजवळ कपडे आणि सायकल दिसली, मग गावकऱ्यांनी शोध घेतला असता धक्काच बसला !

रंगपंचमीच्या दिवशी अंघोळीसाठी गेलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना गोंदियात उघडकीस आली आहे. तलावाजवळ पडलेले कपडे आणि सायकलवरुन तरुणाची ओळख पटवण्यात आली.

तलावाजवळ कपडे आणि सायकल दिसली, मग गावकऱ्यांनी शोध घेतला असता धक्काच बसला !
गोंदियात तरुण तलावात बुडालाImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 08, 2023 | 11:31 AM

गोंदिया / शाहिद पठाण : तलावात अंघोळीसाठी गेलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गोंदियातील कारुटोला येथे घडली आहे. रंजित देवचंद रहांगडाले असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी सालेकसा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. बचाव पथकाने 24 तास शोध घेऊन मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. या घटनेमुळे रंगपंचमीच्या सणाच्या दिवशी गावावर शोककळा पसरली. तलावाजवळ पडलेल्या कपडे, मोबाईल आणि सायकलीवरुन तरुणाची ओळख पटवण्यात आली.

गावकऱ्यांनी तलावाजवळ कपडे आणि सायकल पाहिली

गुरे चरण्यासाठी मंगळवारी दुपारी काही गावकरी गेले होते. यावेळी कारुटोला येथील पांढरा तलावाच्या किनाऱ्याजवळ कपडे, मोबाईल आणि सायकल गावकऱ्यांना दिसली. मात्र कुणीही तलावात अंघोळ करत दिसत नसल्याने लोकांनी गावात याची माहिती दिली. मात्र गावातील लहान मुलांनी रंजित रहांगडाले याला तलावाकडे जाताना पाहिले. तसेच कपडे आणि सायकलवरुन रंजित बुडाला असावा, असा अंदाज लावण्यात आला.

शोधमोहिम राबवत तरुणाचा मृतदेह बाहेर काढला

यानंतर सालेकसा पोलीस आणि बचाव पथकाला याची माहिती देण्यात आली. पोलीस आणि बचाव पथकाने घटनास्थळी दाखल होत तलावात शोध मोहिम सुरु केली. तब्बल 24 तास शोधमोहिम राबवून तरुणाचा मृतदेह पाण्याबाहेर काढला. याप्रकरणी सालेकसा पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा

जरांगेंच्या उपोषणाचा चौथा दिवस, प्रकृती बिघडली, चालताही येईना अन्...
जरांगेंच्या उपोषणाचा चौथा दिवस, प्रकृती बिघडली, चालताही येईना अन्....
गणेशोत्सवात परतीच्या फेऱ्यांमध्ये 'लालपरी' मालामाल,इतक्या कोटींची कमाई
गणेशोत्सवात परतीच्या फेऱ्यांमध्ये 'लालपरी' मालामाल,इतक्या कोटींची कमाई.
'किती नाक रगडलं तरी या जन्मी मुख्यमंत्रिपद नाही', ठाकरेंवर कोणाची टीका
'किती नाक रगडलं तरी या जन्मी मुख्यमंत्रिपद नाही', ठाकरेंवर कोणाची टीका.
हिंदुत्वाची भूमिका घेणारे वाचाळवीर कसे?; दरेकरांचा अजित दादांना सवाल
हिंदुत्वाची भूमिका घेणारे वाचाळवीर कसे?; दरेकरांचा अजित दादांना सवाल.
'फडणवीसांनी आम्हाला बदनाम केलं अन्,,',काँग्रेस नेत्याकडून खदखद व्यक्त
'फडणवीसांनी आम्हाला बदनाम केलं अन्,,',काँग्रेस नेत्याकडून खदखद व्यक्त.
सरन्यायाधीशांच्या घरी बाप्पाचं दर्शन अन् झालेल्या वादावर मोदी म्हणाले
सरन्यायाधीशांच्या घरी बाप्पाचं दर्शन अन् झालेल्या वादावर मोदी म्हणाले.
राणेंच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर दादांची तक्रार, भुजबळ स्पष्ट म्हणाले
राणेंच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर दादांची तक्रार, भुजबळ स्पष्ट म्हणाले.
बदलापूर प्रकरणावरून राऊतांचा हल्लाबोल, 'त्यांना शिंदेंचे संरक्षण...'
बदलापूर प्रकरणावरून राऊतांचा हल्लाबोल, 'त्यांना शिंदेंचे संरक्षण...'.
जालना-बीड मार्गावर लालपरी अन् ट्रकची धडक, अपघातात वाहनांचा चेंदामेंदा
जालना-बीड मार्गावर लालपरी अन् ट्रकची धडक, अपघातात वाहनांचा चेंदामेंदा.
शिंदे गटाच्या आमदाराचा ढोल वाजवतानाचा व्हिडीओ व्हायरल, तुम्ही पाहिलात?
शिंदे गटाच्या आमदाराचा ढोल वाजवतानाचा व्हिडीओ व्हायरल, तुम्ही पाहिलात?.