राजस्थानमध्ये लग्नाच्या बहाण्याने तरुणीवर 8 वर्षे बलात्कार, आरोपीविरुद्ध तक्रार दाखल

पीडितेने अनेकदा प्रियकराकडे लग्नाचा विषय काढला. मात्र प्रत्येक वेळी तो काही ना काही बहाणा देऊन टाळत राहिला. गेल्या आठ वर्षांपासून आरोपी तिच्यावर सतत अत्याचार करत होता.

राजस्थानमध्ये लग्नाच्या बहाण्याने तरुणीवर 8 वर्षे बलात्कार, आरोपीविरुद्ध तक्रार दाखल
प्रातिनिधिक फोटो

राजस्थान : लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणीवर एका तरुणाने 8 वर्षे बलात्कार केल्याची घटना राजस्थानमधील बुंदी येथे उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिसांनी आरोपीचा शोध सुरु केला आहे. याप्रकरणी तक्रार नोंदवण्यासाठी तरुणी आपल्या भावासोबत सोमवारी सकाळी पोलीस ठाण्यात आली आणि तिने आपल्यासोबत झालेल्या दुष्कृत्याबाबत तक्रार नोंद केली, असे एसएचओ ब्रजभान यांनी सांगितले.

लग्नाच्या बहाण्याने तरुणीवर बलात्कार

पीडितेचा आरोप आहे की, जेव्हा पहिल्यांदा तिच्यावर बलात्कार झाला तेव्हा ती अल्पवयीन होती. त्यावरून पोलिसांनी (2n) 5/6 आणि POCSO कायद्याची नोंद करून तपास सुरू केला आहे. पीडित मुलीच्या वडिलांचे 2012 मध्ये निधन झाले. त्यानंतर एक वर्षाने पीडितेची आरोपीसोबत भेट झाली. आरोपीने तरुणीला आपल्या जाळ्यात ओढले. त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून वारंवार तिच्यावर बलात्कार करीत राहिला.

आठ वर्षांपासून सुरु होता बलात्कार

पीडितेने अनेकदा प्रियकराकडे लग्नाचा विषय काढला. मात्र प्रत्येक वेळी तो काही ना काही बहाणा देऊन टाळत राहिला. गेल्या आठ वर्षांपासून आरोपी तिच्यावर सतत अत्याचार करत होता. त्यानंतर लग्न करण्याची वेळ आल्यावर त्याने माघार घेतली. त्यामुळे तरुणीला मोठा मानसिक धक्का बसला आणि तिने कापूरच्या गोळ्या खाल्ल्या. त्यानंतर तिची प्रकृती खालावली. तिला उपचारासाठी नैनवान रुग्णालयात दाखल करण्यात आले.

पोलीस या प्रकरणाच्या तपासात गुंतले

पीडितेने सांगितले की, आरोपीने तिच्यावर दोन ते तीन दिवस कोटा येथील खासगी रुग्णालयात उपचार केले. यानंतर तिला नैनवान येथे आणण्यात आले आणि पोलीस ठाण्याच्या बाहेर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. त्याचवेळी या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. दोषींवर कडक कारवाई केली जाईल. (a young woman was raped for 8 years under the pretext of marriage in rajasthan)

इतर बातम्या

वर्क फ्रॉम होमच्या नावाखाली द्यायचे मोठमोठे टार्गेट, पूर्ण न केल्यास दंड वसूल करायचे

प्रयागराज हत्याकांड: एकतर्फी प्रेमातून चौघांची हत्या केल्याचा पोलिसांचा दावा

Published On - 12:07 am, Tue, 30 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI