गुटखा न दिल्याचा राग, तरुणाने शेजाऱ्यासोबत केले ‘हे’ कृत्य

सिंग हा आपणाशी खोटे बोलत आहे. त्याच्याजवळ गुटखा असूनही तो आपणास देत नाहीत, असा गैरसमज करत अजयने जवळील चाकूने सिंग याला काही कळण्याच्या आता रागाच्या भरात त्याच्यावर सपासप वार केले.

गुटखा न दिल्याचा राग, तरुणाने शेजाऱ्यासोबत केले 'हे' कृत्य
डोंबिवलीत तरुणाकडून शेजाऱ्यावर हल्लाImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Sep 14, 2022 | 12:12 AM

डोंबिवली : डोंबिवली पूर्वेतील त्रिमूर्तीनगर परिसरात एका रहिवाशाकडे शेजाऱ्याच्या एका तरुणाने गुटखा (Gutkha) खाण्यास मागितला. मात्र शेजाऱ्याने आपण गुटखा खात नाही, आपल्याजवळ गुटखा नाही, असे बोलताच संतप्त झालेल्या तरुणाने त्याच्यावर धारदार चाकूने हल्ला (Attack) केला. या हल्ल्यात शेजारी गंभीर जखमी (Injured) झाला आहे. सोमवारी रात्री ही घटना घडली. स्वतंत्रसिंग आवदलाल सिंग असे जखमी तक्रारदाराचे नाव आहे. अजय बलवीर बोथ असे हल्लेखोर आरोपीचे नाव आहे.

काय आहे नेमके प्रकरण ?

डोंबिवली पूर्वेतील त्रिमूर्तीनगरमध्ये स्वतंत्रसिंग आवदलाल सिंग हा राहत असून तो सुतारकाम करतो. सोमवारी रात्री स्वतंत्रसिंग हा रात्री नऊ वाजता जेवण झाल्यानंतर त्रिमूर्तीनगरमधील आपल्या घराबाहेर फेऱ्या मारत होता.

यावेळी त्याच्या शेजारी राहणारा ओळखीतील अजय बोथ समोर आला. त्याने स्वतंत्रसिंग याला थांबवून तुझ्याजवळ गुटखा आहे ना, तो खाण्यासाठी दे, अशी आग्रहाने मागणी केली.

हे सुद्धा वाचा

सिंग याने आपण गुटका खात नाही. आपल्या जवळ गुटखा नाही. गुटख्यावर शासनाची बंदी असल्याने तो कोठे मिळत नाही, असे अजयला सांगितले. सिंग याच्या या बोलण्याचा अजयला राग आला.

सिंग मुद्दाम गुटखा देत नसल्याचा गैरसमज झाला अन्…

सिंग हा आपणाशी खोटे बोलत आहे. त्याच्याजवळ गुटखा असूनही तो आपणास देत नाहीत, असा गैरसमज करत अजयने जवळील चाकूने सिंग याला काही कळण्याच्या आता रागाच्या भरात त्याच्यावर सपासप वार केले. चाकू हल्ल्यात सिंग गंभीर जखमी झाला.

हल्ल्यानंतर आरोपी अजय फरार

जखमी अवस्थेत नातेवाईकांनी सिंग याला तातडीने रुग्णालयात नेले. तोपर्यंत अजय घटनास्थळावरुन पळून गेला होता. जखमी सिंग याच्या तक्रारीवरुन रामनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन फरार अजयचा तपास सुरू केला आहे.

Non Stop LIVE Update
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.