AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ambernath Attack : अंबरनाथमध्ये किरकोळ कारणावरून तरुणावर चॉपरने हल्ला, घटना सीसीटीव्हीत कैद

कल्पेश याने दोन महिन्यांपूर्वी राहुल याला रिक्षेने बदलापूरला न्यायला नकार दिला असल्याच्या रागातून हा हल्ला करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Ambernath Attack : अंबरनाथमध्ये किरकोळ कारणावरून तरुणावर चॉपरने हल्ला, घटना सीसीटीव्हीत कैद
अंबरनाथमध्ये किरकोळ कारणावरून तरुणावर चॉपरने हल्लाImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Jul 26, 2022 | 10:41 PM
Share

अंबरनाथ : अंबरनाथमध्ये दोन गावगुंडांनी किरकोळ कारणावरून एका तरुणावर चॉपरने हल्ला (Attack) केल्याची घटना घडली आहे. गायकवाड पाडा भागात ही घटना असून, ही घटना सीसीटीव्ही (CCTV)त कैद झाली आहे. हल्ला केल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरुन फरार झाले. हल्ल्यात तरुण जखमी (Injured) झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. कल्पेश पाटील असे जखमी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. राहुल गायकवाड आणि चिकू बाविस्कर अशी मारहाण करणाऱ्या आरोपींची नावे आहेत.

रिक्षेने बदलापूरला न्यायला नकार दिला म्हणून हल्ला

अंबरनाथच्या गायकवाड पाडा भागात कल्पेश पाटील हा तरुण वास्तव्यास आहे. याच परिसरात राहुल गायकवाड आणि चिकू बाविस्कर हे दोन गावगुंड राहतात. सोमवारी रात्री साडेबाराच्या सुमारास कल्पेश हा त्याच्या मित्रांसोबत रात्री जेवण करून परिसरात फिरत असताना राहुल गायकवाड आणि चिकू बाविस्कर हे दोघे दुचाकीवरून तिथे आले. यापैकी चिकू बाविस्कर याने कल्पेशच्या डोक्यात बियरची बाटली फोडली. तर राहुल गायकवाड याने त्याच्याजवळील चॉपरने कल्पेश याच्या डोक्यात दोन वार केले. यापैकी एक वार कल्पेशच्या डोक्यात बसला, तर दुसरा वार त्याने हातावर झेलला. यानंतर राहुल आणि चिकू या दोन गावगुंडांनी कल्पेशच्या घरी जाऊन त्याच्या दुचाकी आणि रिक्षाचीही तोडफोड केली. कल्पेश याने दोन महिन्यांपूर्वी राहुल याला रिक्षेने बदलापूरला न्यायला नकार दिला असल्याच्या रागातून हा हल्ला करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

दोन-तीन दिवसांपूर्वी आरोपी राहुलकडून हटेल मॅनेजरला मारहाण

या प्रकरणी अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस सध्या राहुल आणि चिकू यांचा शोध घेतायत. दरम्यान, दोन ते तीन दिवसांपूर्वी अंबरनाथच्या पालेगाव भागात काही गावगुंडांनी उधारी मागितली म्हणून हॉटेलच्या मॅनेजरला मारहाण केली होती. त्या प्रकरणातही राहुल गायकवाड याचा सहभाग असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळं अशा गुंडांना पोलिसांनी जरब बसवण्याची आवश्यकता आहे. (A youth was attacked with a chopper for a minor reason in Ambernath, the incident was caught on CCTV)

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.