AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

100 किमी पाठलाग, आरोपीने अंगावर गाडी घातली पण… सिंघम पोलिसाच्या हिमतीची चर्चा!

जळगाव जिल्ह्यात मोठी घटना घडली आहे. आरोपींचा पाठलाग करत असताना येथे आरोपींनी पोलीस उपनिरीक्षकांच्या अंगावर गाडी घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल आहे.

100 किमी पाठलाग, आरोपीने अंगावर गाडी घातली पण... सिंघम पोलिसाच्या हिमतीची चर्चा!
jalgaon crime news
| Updated on: Jun 16, 2025 | 8:42 PM
Share

जळगाव : स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या अंगावर वाहन घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न झाला आहे. गुरांची तस्करी करणाऱ्या आरोपीला पकडण्याचा प्रयत्न करत असतानी आरोपीकडून चारचाकी रिव्हर्स घेत संदीप पाटील यांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील बालंबाल बचावले असून त्यांना बोटाला, पायाला आणि पोटाजवळील बरगड्यांना दुखापत झाली आहे. या घटनेत पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. तसेच चोरीस गेलेला बैल, चारचाकी वाहन, छोटी तलवार, गुप्ती तसेच लोखंडी रॉड आदी जप्त करण्यात आलं आहे.

आरोपीला अटक करण्याचा प्रयत्न करत असताना

जळगाव जिल्ह्यात गस्त घालत असताना पोलीस निरीक्षक संदीप पाटील हे मुक्ताईनगर येथून गुरांची तस्करी करणाऱ्या वाहनाला तसेच आरोपीला पकडण्याचा प्रयत्न करत असताना आरोपी वाहनासह पसार झाले. या दरम्यान पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी जळगाव ते अकोला असे तब्बल 100 किलोमीटरपर्यंत आरोपीच्या वाहनाचा पाठलाग केला. अकोला पोलिसांच्या मदतीने नाकाबंदी करण्यात आली, यावेळी आरोपीला अटक करण्याचा प्रयत्न करत असताना आरोपीने वाहन रिव्हर्स घेऊन पोलीस निरीक्षकांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेत पोलीस निरीक्षक संदीप पाटील खाली पडले. त्यानंतर त्यांनी आहे त्या अवस्थेत उभे राहून आरोपीच्या मुसक्या आवळल्या. यादरम्यान इतर तिघे फरार झाले.

संदीप पाटील यांच्या धाडसाचे पोलीस दलात कौतुक

घटनेत पोलीस निरीक्षक संदीप पाटील जखमी झाले असून मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. जळगाव ते अकोला तब्बल शंभर किलोमीटरच्या पाठलाग करून आरोपीला अटक करणारा संदीप पाटील यांच्या धाडसाचे पोलीस दलात कौतुक केलं जात आहे. या घटनेबाबत पोलिस अधीक्षक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. घटनेची माहिती देत या प्रकरणात चोरी गेलेला बैल, चारचाकी वाहन तसेच दोन आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.