ते बाईकवर आले, खिशातून पिस्तूल काढत तरुणावर गोळीबार, दिल्ली हादरली

देशाची राजधानी दिल्ली पुन्हा एकदा गोळीबाराच्या घटनेने हादरली आहे.

ते बाईकवर आले, खिशातून पिस्तूल काढत तरुणावर गोळीबार, दिल्ली हादरली
प्रातिनिधिक फोटो

दिल्ली : देशाची राजधानी दिल्ली पुन्हा एकदा गोळीबाराच्या घटनेने हादरली आहे. विशेष म्हणजे भरदिवसा एका तरुणावर दुचाकीवरुन आलेल्या दोन जणांनी गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. संबंधित घटनेचा थरार सीसीटीव्हीत अचूकपणे कैद झाला आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही बघितल्यानंतर संबंधित प्रकार हा गँगवारचा असल्याचा संशय वर्तवला आहे.

पोलिसांना टिल्लू आणि गोगी गँग यांच्यात गँगवार झाल्याचा संशय

संबंधित घटना ही दिल्लीच्या कंझावला पोलीस ठाणे क्षेत्रात घडली आहे. ही घटना शनिवारी (31 जुलै) भर दुपारी घडली. अज्ञात तरुणांनी दुचाकीवरुन येऊन तरुणावर गोळ्या झाडल्या. हा प्रकार सीसीटीव्ही कैद झाला आहे. परिसरातील सीसीटीव्ही बघितल्यानंतर दिल्लीतील टिल्लू आणि गोगी गँग यांच्यात गँगवार झाल्याचा अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात आला आहे.

पोलिसांकडून तपास सुरु

मृतक तरुणाचं नाव नितेश असं असल्याची माहिती समोर आली आहे. आरोपी दुचाकीवरुन आले. त्यांनी तरुणावर गोळ्या झाडल्या. त्यानंतर ते घटनास्थळावरुन फरार झाले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर ते घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तपास सुरु करत परिसरातील सीसीटीव्ही फुटेल तपासले. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांच्या तालुक्यात भर दिवसा गोळीबार

दिल्ली पाठोपाठ महाराष्ट्रातही गुन्हेगारीच्या घटना वाढताना दिसत आहेत. विशेष म्हणजे महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या पुण्यातील आंबेगाव तालुक्यात भर दिवसा तरुणावर गोळीबाराची घटना समोर आली आहे. ही घटना आंबेगाव तालुक्यातील एकलहरे गावात घडली. एकलहरे गावातील रस्त्यावर भर दिवसा कुख्यात गुंड ओंकार याच्यावर आरोपींनी गोळ्या झाडल्या. त्यानंतर ते पळून गेले. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. गुन्हेगारांना पोलिसांची काहीच भीती राहिलेली नाही. त्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण आहे. लोकांमध्ये भीती निर्माण झाली आहे.

हेही वाचा :

पब्लिक मार, ICICI बँकेत दरोडा, पळून जाणाऱ्या नराधमाला पकडला, लोकांनी लाथा-बुक्क्यांनी तुडवला

त्याने आईला मारहाण केली, नंतर तलवार घेऊन पळत सुटला, कल्याणमध्ये माथेफिरुच्या हल्ल्यात पोलीस जखमी

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI