AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

त्याने आईला मारहाण केली, नंतर तलवार घेऊन पळत सुटला, कल्याणमध्ये माथेफिरुच्या हल्ल्यात पोलीस जखमी

हातात तलवार घेऊन भर रस्त्यात एका माथेफिरूने नागरिकांवर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना कल्याण येथे घडली आहे.

त्याने आईला मारहाण केली, नंतर तलवार घेऊन पळत सुटला, कल्याणमध्ये माथेफिरुच्या हल्ल्यात पोलीस जखमी
याच परिसरात माथेफिरू तरुणाने नागरिकांवर हल्ला केला.
Reporter Amjad Khan
Reporter Amjad Khan | Edited By: | Updated on: Aug 01, 2021 | 7:22 PM
Share

ठाणे : हातात तलवार घेऊन भर रस्त्यात एका माथेफिरूने नागरिकांवर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना कल्याण येथे घडली आहे. या हल्ल्यात मानपाडा पोलीस ठाण्याचा एक पोलीस गंभीर जखमी झाला आहे. जखमी झालेल्या पोलिसावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु असून आरोपीला मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपीचे नाव बबलू सूरज नायक असे आहे. (Manpada Police arrested young boy who attacked Two men and One Police with sword)

धारदार तलवार घेऊन तरुण लोकांच्या मागे पळत होता

मिळालेल्या माहितीनुसार 31 जुलैला सकाळी 9 वाजेच्या सुमारास कल्याण पूर्व पिसवली परिसरात अचानकपणे धांदल उडाली. या परिसरात राहणारा बबलू सूरज नायक या 24 वर्षीय तरुणाच्या हाती एक धारदार तलवार होती. धारदार तलवार घेऊन तो लोकांच्या मागे पळत होता. या परिसरात राहणारे भैय्यासाहेब पांडूरंग अहिरे हे पोलीस कर्मचारी मानपाडा पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. यावेळीत ते कर्तव्यावर निघाले होते. याच वेळी बबलूने अहिरे यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात अहिरे यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

आरोपी बबलूचा पाठलाग करत त्याला ताब्यात घेतले

या प्रकाराची माहिती मिळताच मानपाडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मुंबई पोलिसात कार्यरत असलेले पोलीस लक्ष्मण पाटील आणि रिक्षा चालक मंगेश पाटील यांनी बबलूचा पाठलाग केला. तसेच हे दोघे आरोपी बबलू याच्या घरी पोहोचले. त्यानंतर लक्ष्मण पाटील आणि मंगेश पाटील यांनी मोठ्या शिताफीने बबलूला पकडले.

आईनेही स्वत:चा जीव वाचवला

हाती आलेल्या माहितीनुसार बबलू याने त्याच्या आईलादेखील जबर मारहाण केली आहे. आईने गॅलरीतून साडी खाली टाकून साडीच्या मदतीने खाली उतरत स्वत:ची सुटका करुन घेतली. आईला मारहाणीबरोबरच बबलूने एका पोलिसासह अन्य दोघांवर तलवारीने हल्ला केला असल्याची माहिती आहे.

आरोपी बबलूला अटक, तपास सुरु

दरम्यान, या प्रकरणी बबलू नायक याला अटक करण्यात आल्याची माहिती मानपाडा पोलीस ठाण्याचे पीएसआय डी. पी. वाघ यांनी दिली. वाघ यांनी सांगितल्याप्रमाणे बबलू हा व्यवस्थित बोलतो आहे. मात्र त्याने तलवार कोठून आणली ? याची माहिती त्याने दिलेली नाही. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

इतर बातम्या :

VIDEO : पब्लिक मार, ICICI बँकेत दरोडा, पळून जाणाऱ्या नराधमाला पकडला, लोकांनी लाथा-बुक्क्यांनी तुडवला

जिममध्ये भेट, तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं, लग्नाचं आमिष ते अश्लील व्हिडीओ, मुंबईच्या माहिममधील धक्कादायक प्रकार

6 लाखांचं डील, मुलीशी लग्न करण्याचं ठरलं, मुलाने 50 हजारही दिले, पण नवरदेवाला लग्नाआधीच खरं समजलं आणि….

(Manpada Police arrested young boy who attacked Two men and One Police with sword)

Follow Us
अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई! मुंबई महापालिका कचाट्यात, अचानक छापा
अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई! मुंबई महापालिका कचाट्यात, अचानक छापा टाकताच...
माहाराष्ट्रातील पर्यटक गुजरातमधील पूरात अडकले, हेलिकॉप्टरने रेस्क्यू..
Video | माहाराष्ट्रातील पर्यटक गुजरातमधील पूरात अडकले, हेलिकॉप्टरने रेस्क्यूचा थरार! पहा व्हिडीओ
नुसता गोंधळ, धावपळ अखेर... जंतर-मंतर नाही नागपूरातील व्हिडीओ आला समोर
CJP Protest | नुसता गोंधळ, धावपळ अखेर... जंतर-मंतर नाही नागपूरातील व्हिडीओ आला समोर
पावसाचा हाहाकार! पवित्र नदीचं रौद्र रूप, पाण्याची पातळी अचानक वाढली
पावसाचा हाहाकार! पवित्र नदीचं रौद्र रूप, पाण्याची पातळी अचानक वाढली
व्हिडीओ पाहा, पोट धरून हसाल; मुंबई पोलिसांच्या तावडीतून कॉक्रोच पळाले
Viral Video | व्हिडीओ पाहा, पोट धरून हसाल; मुंबई पोलिसांच्या तावडीतून कॉक्रोच पळाले
संध्याकाळी 6 वाजता राहुल गांधींची खासदारांसोबत बैठक,
संध्याकाळी 6 वाजता बैठक, पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेरील आंदोलनानंतर कॉंग्रेसची पुढील रणनीती काय?
मी फक्त भारताच्या बाजूने... सुव्रत जोशींची पोस्ट चर्चेत
Suvrat Joshi | मी फक्त भारताच्या बाजूने... सुव्रत जोशींची पोस्ट चर्चेत; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला समर्थन
मोठी बातमी! CJPच्या आंदोलनानंतर केंद्रात मोठ्या हालचाली, अमित शहा...
मोठी बातमी! CJPच्या आंदोलनानंतर केंद्रात मोठ्या हालचाली, अमित शहा घेणार लोकसभा अध्यक्षांची भेट
आसाममध्ये महापूराचं संकट कायम; 24 तासांत मृतांचा आकडा 31 वर
Assam Flood | आसाममध्ये महापूराचं संकट कायम; 24 तासांत मृतांचा आकडा 31 वर
एका हाताने पोलिस व्हॅन रोखली! मुंबईच्या तरुणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल
Viral Video | एका हाताने पोलिस व्हॅन रोखली! मुंबईच्या तरुणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल