AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काय चाललंय काय हे ? हत्येच्या आरोपींचा खुद्द पोलीस ठाण्यातच सत्कार, दौलताबादमध्ये संतापजनक प्रकार

हत्या आणि हत्येचा प्रयत्न केल्या प्रकरणी आरोप असलेल्यांचा पोलिसांनीच केलेला हा सत्कार पाहून नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. गुरुवारी सोशल मीडियावर या पोलीस ठाण्यातील आरोपींना पुष्पगुच्छ देऊन सत्कार केल्याचा फोटो फिरत होता.

काय चाललंय काय हे ? हत्येच्या आरोपींचा खुद्द पोलीस ठाण्यातच सत्कार, दौलताबादमध्ये संतापजनक प्रकार
हत्येतील आरोपींचा दौलताबाद पोलीस स्टेशनमध्ये सत्कार.
| Edited By: | Updated on: Sep 17, 2021 | 2:41 PM
Share

औरंगाबाद: पोलीस ठाण्यातील गणपतीच्या आरतीला आलेल्या हत्येच्या आरोपींचा सत्कार खुद्द पोलिसांनीच केल्याची घटना नुकतीच औरंगाबादमधील दौलताबाद पोलिस ठाण्यात (Daulatabad Police Station, Aurangabad) घडली. हत्या आणि हत्येचा प्रयत्न केल्या प्रकरणी आरोप असलेल्यांचा पोलिसांनीच केलेला हा सत्कार पाहून नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. गुरुवारी दिवसभर औरंगाबादमधील सोशल मीडियावर (Viral on Social Media) या पोलीस ठाण्यातील आरोपींना पुष्पगुच्छ देऊन सत्कार केल्याचा फोटो फिरत होता. या कृत्याबद्दल पोलिसांना जाब विचारला पाहिजे, अशी प्रतिक्रियाही सामान्यांमधून उमटली.

ठाण्यात गणपतीच्या दर्शनाला आले आरोपी

औरंगाबादमधील दौलताबाद पोलीस ठाण्यात गणपतीच्या दर्शनाला आलेल्या तीन आरोपींचा सत्कार पोलिसांनी केल्याचे गुरुवारी उघडकीस आले. या पोलीस ठाण्यात गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. या गणपतीच्या दर्शनासाठी सर्जेराव चव्हाण, मोसीन खान पठाण आणि वसीम शेख हे तिघे आरोपी आले होते. यापैकी पहिल्या दोघांवर हत्येचा आरोप आहे तर वसीम शेखवर हत्येच्या प्रयत्नाचा आरोप आहे. ठाण्यातील गणपतीच्या दर्शनाला येण्याची हिंमत आरोपींनी दाखवली तरीही पोलिसांनीही त्यापुढे कहर केला. येथील पोलिस अधिकारी दिलीप बचाटे यांनी या तिघांनाही शाल, पुष्पगुच्छ आणि प्रतिमा देऊन त्यांचा सत्कार केला. एवढेच नाही तर याचे फोटोसेशनही केले. मग काय हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले.

पोलिस आयुक्तांच्या पथकावर हल्ल्याचा आरोप

या आरोपींचे नाव एका खून खटल्यात आहे. तसेच पोलिस आयुक्तांच्या पथकावर हल्ला केल्याचा आरोपही त्यांच्यावर आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. असे असूनही पोलिसांकडून या आरोपींचा सत्कार कसा काय केला गेला, यावर संताप व्यक्त केला जात आहे.

आरोपी असल्याची माहिती नव्हती-पो. निरीक्षक

दरम्यान, या विशेष सत्काराविषयी दौलताबाद पोलीस ठाण्याच्या निरीक्षक राजश्री आडे यांना विचारले असता, गणपतीच्या दर्शनासाठी पोलीस ठाण्याच्या परिसरातील अनेक भक्त येत असतात. याठिकाणी दर्शनासाठी आलेल्या विविध लोकांचा सत्कार करण्यात येतो. त्यात या आरोपींचाही समावेश असल्याची माहिती संबंधितांना नव्हती. त्यामुळे हा प्रकार घडल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले.

इतर बातम्या- 

Aurangabad Crime: 60 किमीचा फिल्मी स्टाइल थरार, ट्रायल म्हणून कार पळवणाऱ्यांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या

Aurangabad Crime: खिशात मोबाइल, काखेत ट्रान्समीटर, कानात मख्खी एअरफोन, औरंगाबादेत पोलिस चालक परीक्षेत हायटेक कॉपी केल्याचे उघड

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.