Pune crime | पोलिसांची मोठी कारवाई; तृतीयपंथीच्या खूनातील आरोपी काही तासातच ‘गजा’आड

Pune crime | पोलिसांची मोठी कारवाई;  तृतीयपंथीच्या खूनातील आरोपी काही तासातच 'गजा'आड
'मोक्ष' प्राप्तीचा येडा नाद, लेकरं बाळं, बायको जीवानीशी बाद, एकाच घरात 5 मृतदेह

आरोपी धर्मु ठाकूर मृत आरोपीसोबतजवळीक साधण्याचा प्रयत्न करून लागला. त्यानंतर त्या तिघांमध्ये पैश्यांवरून वाद झाला. यातूनच धर्मु ठाकूर व युगल ठाकूर यांनी तृतीयपंथी आशूचा खून केला. घटनेनंतर दोघेही आपल्या मूळ गावी छत्तीसगढ येथे पळून जाण्याची तयारी करू लागले.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: प्राजक्ता ढेकळे

Dec 14, 2021 | 10:23 AM

पुणे – जिल्ह्यातील शिक्रापूर येथे तृतीयपंथीचा खून झाल्याची घटना नुकतीच घडली होती. या घटनेत खून करून पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या दोघांच्या पुणे ग्रामीण पोलिसांच्या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने त्यांचा मुसक्या आवळ्या आहेत. आशू उर्फ अनिश रामानंद यादव (बजरंगवाडी , शिक्रापूर असं खून झालेल्या तृतीयपंथी व्यक्तीचे नाव आहे. धुर्म जोडितराम ठाकूर (वय २०, बजरंगवाडी, शिक्रापूर मूळ, छत्तीसगड) व युगल लालसिंग ठाकूर (वय १९ ,बजरंगवाडी, शिक्रापूर, मूळ छत्तीसगड ) यांना अटक केली आहे. या प्रकरणी सोमनाथ सासवडे यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

म्हणून केला खून शिक्रापूर येथील पुणे – नगर महामार्गालगत असलेल्या तोरणा हॉटलेच्या मोकळ्या पटांगणात मृत आशूसह दोन आरोपी दारू पित बसले होते. यावेळी आरोपी धर्मु ठाकूर मृत आरोपीसोबतजवळीक साधण्याचा प्रयत्न करून लागला. त्यानंतर त्या तिघांमध्ये पैश्यांवरून वाद झाला. यातूनच धर्मु ठाकूर व युगल ठाकूर यांनी तृतीयपंथी आशूचा खून केला. घटनेनंतर दोघेही आपल्या मूळ गावी छत्तीसगढ येथे पळून जाण्याची तयारी करू लागले. आरोपी पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून दोघांनाही चाकण-शिक्रापूर चौकात अटक केली. ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांच्या नेतृत्वात अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांच्या नेतृत्वात स्थानिक पोलिसांच्या मदतीने ही करवाई करण्यात आली आहे.

जॅकलीनच्या मैत्रीसाठी अमित शहांचा ‘कॉल स्पूफ’; 9 लाखांचे मांजर दिले, थापड्या सुकेशच्या उठाठेवी

Video – Nagpur MLC | चंद्रशेखर बावनकुळे यांचा दणदणीत विजय, आघाडीची मतं फुटली, छोटू भोयर यांना फक्त एक मत

Akola MLC Election Result: अकोल्यातून शिवसेनेचे गोपिकिशन बाजोरिया पराभूत, भाजपचे वंसत खंडेलवाल विजयी

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें