AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बहुचर्चित दुहेरी हत्याकांड खटल्यात अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती, राज्याला हादरून टाकणारं प्रकरण कोणतं ?

नाशिक शहरातील बहुचर्चित दुहेरी हत्याकांडाचा खटला अ‍ॅड. उज्ज्वल निकम हे लढणार आहे. सरकारच्या वतिने त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

बहुचर्चित दुहेरी हत्याकांड खटल्यात अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती, राज्याला हादरून टाकणारं प्रकरण कोणतं ?
Image Credit source: Google
| Updated on: Mar 01, 2023 | 10:53 AM
Share

नाशिक : मागील वर्षी फेब्रुवारी महिन्यात नाशिकमध्ये एक दुहेरी हत्याकांड ( Nashik Murder ) झाल्याचे समोर आले होते. त्यामध्ये धक्कादायक बाब म्हणजे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे माजी कुलसचिव नानासाहेब कापडणीस आणि त्यांचा मुलगा डॉ. अमित कापडणीस याचा खून झाला होता. यानंतर नाशिक शहरासह संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. आता या दुहेरी हत्याकांडाचा खटला सुरू होणार आहे. त्यासाठी सरकारी पक्षातर्फे युक्तिवाद करण्याकरिता अ‍ॅड. उज्ज्वल निकम ( Adv Ujjwal Nikam ) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या दुहेरी हत्याकांड प्रकरणात राज्याच्या गृहविभागाने विशेष लक्ष दिले आहे. अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांचा युक्तिवाद होणार असल्याने हे प्रकरणाचा निकाल काय येणार ? याकडे लक्ष लागून आहे.

बहुचर्चित कापडणीस दुहेरी हत्याकांड प्रकरणी पोलीसांनी जवळपास दीड हजार पानांचे चार्जशिट दाखल केले आहे. खरंतर तब्बल चार महीने हे प्रकरण नाशिकमध्ये चर्चेचा विषय राहिले होते. त्याचे कारण म्हणजे दररोज नवनवीन बाबी समोर येत होत्या.

या दुहेरी हत्याकांडातील मुख्य संशयित आरोपी राहुल जगताप आणि त्याचे साथीदार प्रदीप शिरसाठ, विकास हेमके आणि सूरज मोर यांच्याबाबत ठोस पुरावे मिळाले होते. त्यानंतर सरकारवाडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

कोट्यवधी रुपयांची मालमत्ता हडप करण्यासाठी चित्रपटाला लाजवेल असा कट रचून खून केला होता. या प्रकरणात तीन ते चार जिल्ह्यात या खुणाचे धागेदोरे लागले होते. त्यामुळे हे संपूर्ण प्रकरण पाहता मर्डर मिस्ट्री म्हणून राज्यभर चर्चेचा विषय राहिला होता.

दोषारोपपत्र तयार केले जात असतांना नाशिक पोलीसांनी अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीची मागणी केली होती. त्यानुसार राज्याच्या गृहविभागाने याबाबत नियुक्ती आदेश काढला असून लवकरच हा खटला सुरू होणार आहे.

28 जानेवारी 2022 ला कापडणीस पितापुत्र बेपत्ता झाल्याची तक्रार सरकारवाडा पोलीस ठाण्यात देण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्या खात्यातून 90 लाख रुपये शिरसाठ नावाच्या व्यक्तीने ट्रान्सफर केल्याची बाब निदर्शनास आली होती.

त्यानंतर शिरसाठ याने हे संपूर्ण पैसे जगताप याला दिले होते. जो मुख्य संशयित आहे. सुरुवातीला जगताप याला बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. त्यांनंतर हा संपूर्ण गुन्हा उघडकीस आला होता.

संशयित आरोपी जगताप याने खुनाची कबुली दिल्यानंतर नानासाहेब कापडणीस यांचा मृतदेह मोखडा येथे सापडला होता तर अमितचा कापडणीस चा मृतदेह राजुर मध्ये जाळून टाकलेला होता. त्यानंतर इतरांना औरंगाबाद येथून अटक केली होती.

जगताप याने कापडणीस यांची कोट्यवधी रुपयांची संपत्ती हडप केली होती. हॉटेल सुरू केले होते. महागडी गाडी खरेदी केली होती. त्यानंतर मोबाइल आणि कागदपत्रे पोलीसांनी जप्त केले आहे.

उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात
उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात.
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप.
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द.
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी.
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा.
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका.
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला.
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला.
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान.
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ...
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ....