27 गुन्हे नावावर असलेल्या सराईत गुन्हेगाराच्या अहमदनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या

महामार्गावर वाहने अडवून लुटमार करणाऱ्या टोळीचा प्रमुख सराईत गुन्हेगाराला पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आलंय. सागर भांड असं या आरोपीचे नाव असून त्याला पुणे जिल्ह्यातून जेरबंद करण्यात आलंय.

27 गुन्हे नावावर असलेल्या सराईत गुन्हेगाराच्या अहमदनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या
सराईत गुन्हेगाराच्या अहमदनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या...
Follow us
| Updated on: Sep 04, 2021 | 9:26 AM

अहमदनगर : महामार्गावर वाहने अडवून लुटमार करणाऱ्या टोळीचा प्रमुख सराईत गुन्हेगाराला पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आलंय. सागर भांड असं या आरोपीचे नाव असून त्याला पुणे जिल्ह्यातून जेरबंद करण्यात आलंय.

ऑगस्ट महिन्यात दिलीप देवराम तमनर हे घरी जात असताना त्यांना अनोळखी इसमाने कोयत्याचा धाक दाखवून लूटमार केली होती. त्यांच्याकडून रोख रक्कम, मोबाईल, बॅग आणि मोटार सायकल असा एकूण 30 हजाराचा मुद्देमाल बळजबरीने चोरुन नेला होता. याच आरोपीवर आतापर्यंत तब्बल 27 गुन्हे दाखल आहेत.

याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना गुप्त माहिती मिळाली, त्यानुसार त्यांनी सागर भांड याला पुणे जिल्ह्यातून ताब्यात घेतलाय.

कशी झाली अटक?

सदर गुन्ह्यातील वरील नमुद आरोपी यांचा मुख्य साथीदार टोळी प्रमुख सागर भांड हा सदरचा गुन्हा केल्यापासून नजरेआड झालेला होता. अनिल कटके, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांचे मार्गदर्शनाखाल स्थानिक गुन्हे शाखेचे पथक हे आरोपी सागर भांड याचा शोध घेत असताना पोनि/ अनिल कटके यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली कि आरोपी सागर भांड हा रांजणगाव, ता. शिरूर, जि. पुणे येथे भाड्याने खोली घेवून रहात आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. तिथे जाऊन पोलिसांनी त्.ाला ताब्यात घेतलं.

यापूर्वीही अनेक गुन्हे नावावर

आरोपीवर आतापर्यंत तब्बल 27 गुन्हे दाखल आहेत. सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर तसेच त्यापूर्वीही वाहन चालकांना अडवून लुटमार करण्याच्या घटना घडलेल्या असल्याने मा. पोलीस अधीक्षक अहमदनगर यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वरील नमुद गुन्ह्याचा समांतर तपास करुन सदरचा गुन्हा उघडकीस आणून 1) नितीन मच्छिन्द्र माळी, वय 22 वर्षे, रा. मोरे चिंचोरे, ता. राहूरी, 2) गणेश रोहीदास माळी, वय २१ वर्षे, रा. खडकवाडी, मूळा डॅम जवळ, ता. राहूरी, 3) रवि पोपट लोंढे, वय 22 वर्षे, रा. घोडेगाव, ता. नेवासा, 4) निलेश संजय शिंदे, वय 21 वर्षे, रा. पारिजात चौक, पाईपलाईन रोड, अहमदनगर, 5) रमेश संजय शिंदे, वय- 20 वर्षे, रा. बारागाव नांदूर, ता. राहूरी व 6) एक अल्पवयीन साथीदार यांना यापूर्वी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेवून राहूरी पोलिस स्टेशन येथे हजर केलेले आहे.

(Ahmednagar police Arrest Wanted Thieve)

हे ही वाचा :

Sachin Vaze : सचिन वाझेने अंबानींच्या घराबाहेर स्फोटकांची गाडी का ठेवली? सर्वात मोठं कारण समोर

मोठी बातमी: चंद्रकांत पाटलांच्या नावाने वनविभागाची पुण्यातील 18 एकर जमीन बळकावण्याचा प्रयत्न

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.