नगरमध्ये लॉजवर धडक कारवाई; लागोपाठ चार ठिकाणी छापेमारी

मिळालेल्या माहितीनुसार विभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक विजय करे यांनी पाच पोलीस ठाण्याची विविध पथके तयार केली.

नगरमध्ये लॉजवर धडक कारवाई; लागोपाठ चार ठिकाणी छापेमारी
नगरमध्ये लॉजवर धडक कारवाई
Image Credit source: TV9
वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

|

Sep 22, 2022 | 7:20 PM

अहमदनगर / मनोज गाडेकर (प्रतिनिधी) : अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा फाटा येथे एकाच वेळी चार लॉजवर छापा (Raid) टाकून अवैध वेश्याव्यसाय‌ चालवणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश (Exposed) केला आहे. या कारवाईत सात परप्रांतीय तरुणींना ताब्यात (Detained) घेण्यात आले आहे. या संबंधित लॉजवरही कारवाई केली जाणार आहे. विभागीय पोलीस अधिकारी संदिप मिटके यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसह एकाच वेळी चार लॉजवर छापेमारी केली.

गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांची छापेमारी

नेवासा फाटा येथे काही लॉज चालक अवैधरित्या वेश्या व्यवसाय चालवत असल्याची माहीती पोलिसांना मिळाली होती. त्यासाठी परप्रांतीय तरुणींचा वापर केला जात होता. मिळालेल्या माहितीनुसार विभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक विजय करे यांनी पाच पोलीस ठाण्याची विविध पथके तयार केली.

सात परप्रांतीय तरुणी ताब्यात

बुधवारी सायंकाळी नगर- औरंगाबाद रस्त्यावरील चार लॉजवर एकाच वेळी छापे टाकण्यात आले. यावेळी तीन लॉजवर सात परप्रांतीय तरुणींच्या माध्यमातून हा अवैध वेश्या व्यवसाय सुरू होता. पोलिसांनी या तरुणींना ताब्यात घेतले आहे.

हॉटेल चालकांवर गुन्हे दाखल

या प्रकरणात हॉटेल चालकांसह मॅनेजरवर अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आल्याचे मिटके यांनी सांगितले.

यावेळी हॉटेल तिरंगा येथून 3, हॉटेल नाथगंगा येथून 3 आणि हॉटेल पायल येथून अशा 7 पिडीत मुलींची सुटका करण्यात आली आहे. या कारवाईने नगर-औरंगाबाद रस्त्यावरील हॉटेल व्यवसायिकांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

नेवासा फाटा परिसर गेल्या काही दिवसांपासून अवैध वेश्या व्यवसायाचा अड्डा बनला होता. पोलिसांनी एकाच वेळी चार ठिकाणी छापा टाकून या व्यवसायाचा पर्दाफाश केला आहे.

हे सुद्धा वाचा


Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें