विनेश फोगाटबद्दल लिहिताना मर्यादा सोडली, एफआयआर दाखल; पोलीस ठाण्यातच महिलांचा मोठा हंगामा

प्रसिद्ध कुस्तीपटू विनेश फोगाट हिला ऑलिम्पिकच्या अंतिम सामन्यात अपात्र ठरवण्यात आलं आहे. त्यामुळे तिला सुवर्णपदकाला मुकावं लागलं आहे. या धक्कादायक घटनेनंतर त्याचे देशभरातून पडसाद उमटत आहेत. विनेशवर अन्याय झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे. तसेच तिचं सांत्वनही केलं जात आहे. मात्र, एका तरुणाने विनेशच्या विरोधात पोस्ट शेअर केल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

विनेश फोगाटबद्दल लिहिताना मर्यादा सोडली, एफआयआर दाखल; पोलीस ठाण्यातच महिलांचा मोठा हंगामा
vinesh phogat Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 09, 2024 | 5:06 PM

प्रसिद्ध कुस्तीपटू विनेश फोगाट ऑलिम्पिकच्या अंतिम सामन्यात अपात्र ठरली. त्यामुळे तिला सुवर्णपदक मिळू शकलं नाही. त्यानंतर तिने कुस्तीतून संन्यास घेत असल्याची घोषणाही केली. पण उत्तर प्रदेशातील अलिगडमध्ये विशाल नावाच्या एका तरुणाने त्याच्या फेसबुकवरून विनेश विरुद्ध अत्यंत खालच्या भाषेत पोस्ट केली. पोस्ट करताना त्याने मर्यादाच सोडली. त्यामुळे जाट समाज आणि समाजावादी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात येऊन जोरदार हंगामा केला. या गोंधळामुळे क्वार्सी पोलीस ठाण्यात संबंधित तरुणाविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

काल 8 ऑगस्ट रोजी अलिगडच्या क्वार्सी पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. विनेश फोगाट हिच्या विरोधात आपत्तीजनक मजकूर फेसबुकवर लिहिण्यात आला होता. त्याची आम्ही दखल घेतली असून आयटी कलमांच्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सर्व तांत्रिक पुरावे गोळा करून पुढील कायदेशीर कार्यवाही करण्यात येणार आहे, असं क्वार्सी पोलीस ठाण्याचे एसीपी अमृत जैन यांनी सांगितलं.

दबाव आला अन्…

कुस्तीपटू विनेश फोगाट हिला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 100 ग्रॅम वजन अधिक भरल्याने अंतिम सामन्यातून अपात्र घोषित करण्यात आलं होतं. त्यानंतर विशाल वार्ष्णेय नावाच्या एका यूजर्सने फेसबुक पोस्टवर आपत्तीजनक कमेंट केली होती. ही तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याची गंभीर दखल घेतली. पोलिसांनी विशालवर एफआयआर दाखल केला. जाट समाजातील लोकांनी पोलीस ठाण्यात येऊन गोंधळ घातला. आरोपीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

सर्वांनाच धक्का

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अंतिम सामन्यात पोहोचूनही केवळ वजन वाढल्यामुळे विनेश फोगाट हिला अपात्र ठरवण्यात आल्याने प्रत्येकजण आश्चर्यचकीत झाला आहे. कुस्ती संघ आणि राजकीय पक्षांनी त्यावर नाराजी व्यक्त केली आहे. देशभरातील लोकही नाराज झाले आहेत. स्वत: विनेश फोगाट ही सुद्धा प्रचंड नाराज झाली होती. तिला नैराश्य आलं होतं. त्यामुळे तिला प्रोत्साहन देण्यासाठी लोक तिच्या बाजूने पोस्ट करत आहेत. असं असतानाच या तरुणाने अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन फोगाटबद्दल फेसबुकवर लिहिल्याने त्याच्याविरोधात समाजवादी पार्टी आणि जाट समाजाने प्रचंड संताप व्यक्त करत निषेध नोंदवला आहे.

प्रसूतीसाठी गर्भवतीला पुराच्या पाण्यातून नेले; बांबूची झोळी अन् पायपीट
प्रसूतीसाठी गर्भवतीला पुराच्या पाण्यातून नेले; बांबूची झोळी अन् पायपीट.
सरन्यायाधीशांच्या घरी मोदी, विरोधकांच्या टीकेवर फडणवीसांचं प्रत्युत्तर
सरन्यायाधीशांच्या घरी मोदी, विरोधकांच्या टीकेवर फडणवीसांचं प्रत्युत्तर.
शिवसेनेकडून मुस्लिम महिलांना बुरखा विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
शिवसेनेकडून मुस्लिम महिलांना बुरखा विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
'मग अजितदादांना कुठे फेकायचं तेही सांगा',शरद पवार गटातील नेत्याचा सवाल
'मग अजितदादांना कुठे फेकायचं तेही सांगा',शरद पवार गटातील नेत्याचा सवाल.
खर्गे राजीनामा देणार? भाजप आक्रमक, कुणी केली राजीनाम्याची मागणी
खर्गे राजीनामा देणार? भाजप आक्रमक, कुणी केली राजीनाम्याची मागणी.
'त्या' पत्रानंतर किरीट सोमय्या म्हणाले, 'मला कोणतंही पद नको, तर मला..'
'त्या' पत्रानंतर किरीट सोमय्या म्हणाले, 'मला कोणतंही पद नको, तर मला..'.
'माझी विनंती, आता फसायच नाही', बार्शीच्या आमदारान जरांगेंना जोडले हात
'माझी विनंती, आता फसायच नाही', बार्शीच्या आमदारान जरांगेंना जोडले हात.
'जरांगे म्हणतील का..राहुल गांधी फडणवीसांचा माणूस?' भाजप नेत्याचा सवाल
'जरांगे म्हणतील का..राहुल गांधी फडणवीसांचा माणूस?' भाजप नेत्याचा सवाल.
हा रस्ता म्हणावा की काय? मुंबईच्या या भागातील रस्त्याला भलं मोठं भगदाड
हा रस्ता म्हणावा की काय? मुंबईच्या या भागातील रस्त्याला भलं मोठं भगदाड.
बारामती अन् साताऱ्यात बाप्पाच्या सजावटीत थेट दादांची लाडकी बहीण योजना
बारामती अन् साताऱ्यात बाप्पाच्या सजावटीत थेट दादांची लाडकी बहीण योजना.