कल्याण-डोंबिवलीमध्‍ये अंधश्रध्देचा कळस, भर रस्त्यात नग्न होऊन केला जादूटोण्‍याचा विधी

सुनील जाधव

सुनील जाधव | Edited By: वैजंता गोगावले, Tv9 मराठी

Updated on: Nov 28, 2022 | 7:49 PM

दीपक हॉटेल परिसरात रविवारी रात्री भर रस्त्यात एक बाबा जादूटोण्याचा विधी करत होता. तब्बल अर्धा तास हा प्रकार सुरु होता. यामुळे रस्त्यावरील वाहतूक खोळंबली होती.

कल्याण-डोंबिवलीमध्‍ये अंधश्रध्देचा कळस, भर रस्त्यात नग्न होऊन केला जादूटोण्‍याचा विधी
कल्याण-डोंबिवलीमध्‍ये अंधश्रध्देचा कळस
Image Credit source: Google

कल्याण : कल्याण पश्चिम परिसरातील आग्रा रोड परिसरात धक्कदायक घटना उघडकीस आली आहे. आग्रा रोड परिसरातील दीपक हॉटेल जवळ काल रात्री 11.30 च्या दरम्यान एक व्यक्‍ती नग्न होऊन भर रस्त्यात जादूटोणा करताना आढळून आली. यामुळे अर्धा तास परिसरातील वाहतूक खोळंबली होती. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत माथेफिरु बाबाला हाकलून दिले. यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली.

भररस्त्यात सुरु होता जादूटोणा

दीपक हॉटेल परिसरात रविवारी रात्री भर रस्त्यात एक बाबा जादूटोण्याचा विधी करत होता. तब्बल अर्धा तास हा प्रकार सुरु होता. यामुळे रस्त्यावरील वाहतूक खोळंबली होती. तसेच बघ्यांचीही गर्दी जमली होती.

हद्दीच्या वादातून पोलिसांना पोहचण्यास विलंब

या प्रकारामुळे वाहन चालक पुरते हैराण झाले होते. अखेर एका वाहन चालकाने पोलिसांना फोन करुन घटनेची माहिती दिली. मात्र हद्दीची वाद असल्याने पोलीस पोहचण्यास उशीर झाला.

परिसरात भितीचे वातावरण

अखेर पोलीस आल्यानंतर या माथेफिरू नग्न बाबाला हकलून लावले. मात्र या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, हा व्यक्ती मनोरुग्ण असून, त्याला चिडवल्याने तो चिडून हा प्रकार करीत होता.

मात्र हा व्यक्ती कोण आहे. त्याच्याकडे जादूटोण्याचे साहित्य कुठून आले? याबाबत तपास सुरु आहे. हा अंधश्रद्धेचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त केल्याने पोलिसांनी या प्रकरणी ठोस कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

हे सुद्धा वाचा


Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI