अश्विनी बिद्रे हत्याकांडातील मुख्य आरोपीच्या पत्नीचा कोरोनाने मृत्यू, मुलगा-मुलगीही पॉझिटिव्ह, कोर्टाने जामीन अर्ज फेटाळला

अश्विनी बिद्रे हत्याकांडातील मुख्य आरोपी बडतर्फ वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर याचा विनंती अर्ज न्यायमूर्ती माधुरी आनंद यांनी फेटाळला आहे (Ashwini Bidre murder case main accused's wife death due to corona).

अश्विनी बिद्रे हत्याकांडातील मुख्य आरोपीच्या पत्नीचा कोरोनाने मृत्यू, मुलगा-मुलगीही पॉझिटिव्ह, कोर्टाने जामीन अर्ज फेटाळला
सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे
Follow us
| Updated on: Apr 20, 2021 | 11:02 PM

नवी मुंबई : अश्विनी बिद्रे हत्याकांडातील मुख्य आरोपी बडतर्फ वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर याचा विनंती अर्ज न्यायमूर्ती माधुरी आनंद यांनी फेटाळला आहे. कुरुंदकराच्या पत्नीचे कोरोनाने 15 एप्रिल रोजी निधन झालं. पत्नीच्या मृत्यूनंतर दशक्रिया आणि इतर विधी करण्यासाठी अभय कुरुंदकर याने एक दिवस पोलीस बंदोबस्तात घरी जाण्याची सवलत मिळावी म्हणून पनवेल सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. पण न्यायमूर्ती माधुरी आनंद यांनी अर्ज फेटाळला (Ashwini Bidre murder case main accused’s wife death due to corona).

कोर्टाची भूमिका काय?

“जो धार्मिक विधी तुम्हाला करायचा आहे तो जेलमधूनच व्हिडिओ कॉलद्वारे करा. प्रवासात बंदोबस्तावरील पोलीस आणि नंतर परत आल्यावर जेलमधील अन्य कैद्यांना कोरोना संसर्ग होण्याची शक्यता निर्माण होवू शकते”, असे मत कोर्टाने नोंदविले आहे. यावेळी पनवेल सत्र न्यायालयात विशेष सरकारी वकील प्रदीप घरत आणि आरोपीचे वकील हजर होते.

अश्विनी बिद्रे हत्या प्रकरण काय?

सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे उर्फ अश्विनी राजू गोरे या नवी मुंबईतील कळंबोलीतून 15 एप्रिल 2016 पासून बेपत्ता झाल्या होत्या. अश्विनी बिद्रे गायब होण्यामागे वरिष्ठ पोलिस अधिकारी अभय कुरुंदकर यांचा हात असल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला होता. पोलीस सुरुवातीला या प्रकरणाच्या तपासात सहकार्य करत नसल्याचा आरोप बिद्रे यांच्या कुटुंबियांनी केला होता. अखेर अश्विनी बिद्रे यांची हत्या झाल्याचं उघड झालं. त्यांच्या मृतदेहाचे तुकडे-तुकडे करुन वाशीच्या खाडीत टाकण्यात आले होते. या प्रकरणी मुख्य आरोपी कुरुंदकरसह चौघे जण तुरुंगात आहेत.

अश्विनी बिद्रे यांचा विवाह 2005 साली हातकणंगले गावातील राजू गोरे यांच्यासोबत झाला होता. लग्न झाल्यानंतर एकाच वर्षात अश्विनी स्पर्धा परीक्षा पास झाल्या आणि त्यांची पोलीस उपनिरीक्षकपदी नियुक्ती झाली. पोलीस दलात रुजू झाल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग पुणे आणि त्यानंतर सांगली याठिकाणी झाली. यावेळी त्यांची ओळख त्याच पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर यांच्यासोबत झाली. या दोघांमध्ये जवळीक वाढली. त्यानंतर 2013 साली अश्विनी गोरे यांना प्रमोशन मिळाल्याने त्या रत्नागिरीला रुजू झाल्या. इथेही अभय कुरुंदकर अश्विनीला भेटण्यासाठी वारंवार येत होता. हे सर्व प्रकरण अश्विनी यांचे पती आणि वडिलांना समजलं.

हेही वाचा : मुंबई लोकल सर्वसामान्यांसाठी बंद, कडक लॉकडाऊनमध्ये काय सुरु काय बंद?

Non Stop LIVE Update
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?.
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?.
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा.
माळशिरसच्या मोहिते पाटलांचं ठरलंय, हाती तुतारी घेणार? पवारांसोबत जमलंय
माळशिरसच्या मोहिते पाटलांचं ठरलंय, हाती तुतारी घेणार? पवारांसोबत जमलंय.
नवनीत राणांचा प्रचार करणार? बच्चू कडू म्हणाले, 'त्यांच्या बापाची...'
नवनीत राणांचा प्रचार करणार? बच्चू कडू म्हणाले, 'त्यांच्या बापाची...'.
'मोदी आणि माझ्यात वाद नाही'; केंद्रीय मंत्री गडकरींची EXCLUSIVE मुलाखत
'मोदी आणि माझ्यात वाद नाही'; केंद्रीय मंत्री गडकरींची EXCLUSIVE मुलाखत.