प्रेमाखातर चार लेकरांना सोडून प्रियकरासोबत पळून गेली, पतीसोबत राहण्यास नकार, गावातील जमावाकडून भर सभेत मारहाण

एक महिला आपल्या प्रियकरासोबत पळून गेली होती. तिला पहिल्या पतीपासून चार मुलं आहेत. पण तिला गावातील दुसऱ्या तरुणावर प्रेम जडलं होतं. पण याच गोष्टीवरुन गावात ग्रामपंचायतीची बैठक भरवण्यात आली. पण या बैठकीत प्रचंड गदारोळ झाला.

प्रेमाखातर चार लेकरांना सोडून प्रियकरासोबत पळून गेली, पतीसोबत राहण्यास नकार, गावातील जमावाकडून भर सभेत मारहाण
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us
| Updated on: Nov 01, 2021 | 3:57 PM

रांची (झारखंड) : प्रत्येक व्यक्तीला जसं हवं तसं जगण्याचा अधिकार आहे. देशाच्या संविधानाने त्याला तसा अधिकार दिला आहे. ती व्यक्ती आपल्या इच्छेनुसार कुणावरही प्रेम करु शकते किंवा कुणासोबतही राहू शकते. पण काहींना ही गोष्ट रुचत नाही. विशेषत: ग्रामीण भागातील नागरिकांना काही गोष्टी पटत नाहीत. त्यातूनच काही धक्कादायक घटना समोर येतात. अशीच एक धक्कादायक घटना झारखंडच्या धनबाद जिल्ह्यातून समोर आली आहे. एक महिला आपल्या प्रियकरासोबत पळून गेली होती. तिला पहिल्या पतीपासून चार मुलं आहेत. पण तिला गावातील दुसऱ्या तरुणावर प्रेम जडलं होतं. पण याच गोष्टीवरुन गावात पंचायत भरवली गेली होती. या पंचायती दरम्यान प्रेमी जोडप्यावर जमावाकडून हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

नेमकं काय घडलं?

संबंधित घटना ही धनबाद जिल्ह्यातील जमहाडी पंचायत येथील एका गावात घडलीय. गावात ग्रामपंचायतीची बैठक सुरु असताना प्रेमी जोडप्यावर गावातील एका तरुणांच्या जामावाकडून हल्ला करण्यात आल्याचा आरोप आहे. या घटनेतील तरुणीचं नाव रुखसाना असं आहे. तर तिच्या प्रियकराचं रमजान अन्सारी असं नाव आहे. विशेष म्हणजे बैठकीदरम्यान जमावाने रुखसाना आणि रमजानला वाचविण्यासाठी पुढे आलेल्या त्याच्या आई-वडिलांना देखील मारहाण केली. या मारहाणीत रमाजान आणि त्याच्या वडिलांची प्रकृती चिंताजनक आहे. ग्रामपंचायतीच्या या सभेत प्रचंड गदारोळ झाला. अखेर गावातील काही सुज्ञ नागरिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पण पोलीस येईपर्यंत आरोपी फरार झाले होते. त्यानंतर पोलीस गावातून निघून गेले. पण तपासाच्या पार्श्वभूमीवर पोलीस पुन्हा गावात आले तेव्हा पोलिसांनी या प्रकरणी तीन आरोपींना बेड्या ठोकल्या.

नेमकं प्रकरण काय?

या प्रकरणाला ठिणगी पडली ती एका प्रेम प्रकरणापासून. खरंतर गावातील तरुण रमजान अन्सारी याचं गावातीलच विवाहिता असलेल्या रुखसानावर जीव जडला होता. त्यांच्यात सुरुवातीला बोलणंचालणं वाढलं. त्यातून ते प्रेमात पडले होते. रुखसानाचा पती हा तामिळनाडूत कामानिमित्ताने राहतो. त्यामुळे रुखसाना आपल्या सासरच्यांसोबत चार मुलांचा सांभाळ करायची. या दरम्यान तिचं रमजानसोबत प्रेम प्रकरण सुरु झालं. ते एकमेकांच्या इतक्या प्रेमात पडले की त्यांनी गावातून पळून जाण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे ते दोघे गावातून पळून देखील गेले.

या घटनेनंतर गावात रमजानवर संताप व्यक्त केला जात होता. सर्व गावकरी या विषयावर चर्चा करत असत. या दरम्यान रुखसाना आणि रमजान हे कुठं राहतात याची माहिती गावकऱ्यांना मिळाली. गावकरी संबंधित गावात त्यांना भेटण्यासाठी गेले. तिथे रुखसाना आणि रमजान पती-पत्नी असल्यासारखं राहत होते. पण गावकऱ्यांनी त्यांना पुन्हा गावी येण्याची विनंती केली. रुखसानाला चार लहान मुलं आहेत. त्यांचा विचार करावा, असं गावकऱ्यांनी विनंती केली. त्यानंतर दोन्ही गावात आले. गावात या प्रकरणावरुन बैठक घेण्यात आली. पण या बैठकीत काही गावकऱ्यांनी प्रेमी जोडप्यावर हल्ला केला. यावेळी प्रचंड गदारोळ झाला.

हेही वाचा :

दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर देशात घातपाताचा मोठा कट? 46 रेल्वे स्थानके बॉम्बने उडवण्याची धमकी

बचत गटवाल्या चौकडीने औरंगाबादेतल्या वकील महिलेलाही फसवलं, 18 लाखांचा गंडा घातल्याचं उघड

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.