Baba Siddiqui Murder : सिद्दीकींच्या हत्येला लॉरेन्सने खरंच परवानगी दिली का ? बिश्नोईच्या भूमिकेबाबत पोलिसांना संशय

बाबा सिद्दीकींच्या हत्येप्रकरणी आत्तापर्यंत 10 जणांना अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखेकडून त्यांची कसून चौकशीही करण्यात येत आहे. त्या दरम्यान अनेक मोठे खुलासे झाले असून महत्वाची माहिती समोर आली आहे.

Baba Siddiqui Murder : सिद्दीकींच्या हत्येला लॉरेन्सने खरंच परवानगी दिली का ? बिश्नोईच्या भूमिकेबाबत पोलिसांना संशय
Follow us
| Updated on: Oct 21, 2024 | 11:06 AM

महाराष्ट्राची राजधानी मुंबईीतील वांद्रे येथील गजबजलेल्या भागात, भररस्त्यात एका राजकारण्याची झालेली हत्या … संपूर्ण राज्यच नव्हे तर देश ढवळून काढणाऱ्या या घटनेने खळबळ माजवली. 12 ऑक्टोबर रोजी बाबा सिद्दीकी यांची तिघांनी गोळ्या झाडून हत्या केली आणि एकच गजारोळ माजला. या घटनेला आता जवळपास 10 दिवस होत आले आहेत. याप्रकरणाचा तपास करणाऱ्या गुन्हे शाखेने दोन मारेकऱ्यांसह 10 जणांना अटक केली आहे. मात्र गोल्या झाडणारा मुख्य मारेकरी शिवकुमार, तसेच शुभम लोणकर आणि झिशान अख्तर हे अद्यापही उरार आहेत.

सिद्दीकी यांच्या हत्येच्या दुसऱ्याच दिवशी शुभम लोणकरने त्याच्या फेसबूक अकाऊंटवरून पोस्ट केली, ज्याने सर्वांचे लक्ष वेधले गेले. लॉरेन्स बिश्नोई गँगने ही हत्या केल्याचे त्यात नमूद करण्यात आले होते आणि तेव्हापासूनच बिश्नोई गँग पुन्हा चर्चेत आली. पोलीसही त्या दृष्टीने तपासत करत असून आत्तापर्यत अनेकांन ताब्यातही घेण्यात आले आहे. शुक्रवारी आणखी 5 जणांना डोंबविली, पनवेल परिसरातून अटक केली. त्याच्या चौकशीतून बरीच माहिती समोर आली आहे.

लॉरेन्स बिश्नोईच्या नकळत केला का करार ?

मात्र आता याप्रकरणाला नवा ट्विस्ट मिळण्याची शक्यता आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येतील लॉरेन्स बिश्नोईच्या भूमिकेबाबत पोलीस अद्याप अनिश्चित आहेत. तो सध्या गुजरातच्या साबरमती तुरूंगात कैद असून या हत्याप्रकरणी लॉरेन्सचे नाव समोर आल्यानंतर पोलीस परस्परविरोधी दावे मांडत आहेत. शुभम लोणकर उर्फ ​​शुब्बू याने काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर पोस्ट टाकत बिश्नोईच्या टोळीच्या वतीने जबाबदारी स्वीकारली होती. मात्र लॉरेन्स बिश्नोईने स्वत: या हत्येला परवानगी दिली होती का? किंवा त्याच्या नकळत हा करार केला गेला होता का? असा सवाल अधिकारी करत आहेत.

सध्या गुजरातच्या साबरमती तुरुंगात बंद असलेला लॉरेन्स बिश्नोईपर्यंत पोलीस पोहोचू शकलेले नाहीत. त्यामुळे सिद्दीकी यांच्या हत्येत लॉरेन्सच्या थेट सहभागाबद्दल तपास यंत्रणांना अनिश्चितता आहे. फरार आरोपी शुभम लोणकर, शिवकुमार गौतम आणि झिशान अख्तर यांनी स्वतंत्रपणे करार स्वीकारला असावा, असा संशय आहे. झोपडपट्टी पुनर्वसनाचा मुद्दा सिद्दीकी यांच्या हत्येमागचं कारण असू शकतो असा संशयही पोलिसांना आहे. या प्रकरणी पोलिस सर्व बाजूंनी तपास करत आहेत.

बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई आणि त्याचा सहकारी रोहित गोदारा किंवा कॅनडात राहणारे गोल्डी ब्रार यांच्यासह टोळीचे म्होरके यांनी या हत्येसंबंधी मौन बाळगले आहे, त्यादृष्टीनेही पोलीस तपास करत आहेत. जनरली एखाद्या अशा घटनेनंतर ते टोळीच्या कारवायांमध्येल सहभाग असल्याचे स्वीकारतात किंवा नाकारतात. परंतु सिद्दीकी यांच्या हत्येनंतर इतके दिवासांनीही या व्यक्तींनी मौन राखल्यामुळे लोणकरने जो दावा केला आहे त्याबद्दल पोलिसांच्या मनात संदेह निर्माण झाला आहे.

मंत्रिमंडळ विस्ताराचं पत्र राज्यपालांना देणार, १९९१ नंतर पहिल्यांदाच..
मंत्रिमंडळ विस्ताराचं पत्र राज्यपालांना देणार, १९९१ नंतर पहिल्यांदाच...
श्रीकांत शिंदेंचा राहुल गांधींना संसदेत थेट सवाल, 'तुमच्या आजी...'
श्रीकांत शिंदेंचा राहुल गांधींना संसदेत थेट सवाल, 'तुमच्या आजी...'.
फडणवीसांच्या 'सागर'वर घडतंय काय? शपथविधीआधीच मनसेचा नेता भेटीला अन्...
फडणवीसांच्या 'सागर'वर घडतंय काय? शपथविधीआधीच मनसेचा नेता भेटीला अन्....
घाटकोपर पूर्व द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, क्रेन कोसळली अन्...
घाटकोपर पूर्व द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, क्रेन कोसळली अन्....
मुख्यमंत्री फडणवीसांचं अनोखं स्वागत, थेट 'लाडकी बहीण'ची रांगोळी अन्..
मुख्यमंत्री फडणवीसांचं अनोखं स्वागत, थेट 'लाडकी बहीण'ची रांगोळी अन्...
'आता राम आठवतोय, उद्धव ठाकरे नौटंकी...', किरीट सोमय्यांचा हल्लाबोल
'आता राम आठवतोय, उद्धव ठाकरे नौटंकी...', किरीट सोमय्यांचा हल्लाबोल.
शिंदेंच्याच दोन बड्या नेत्यांची मंत्रिपदासाठी धडपड अन् भेट नाकारली
शिंदेंच्याच दोन बड्या नेत्यांची मंत्रिपदासाठी धडपड अन् भेट नाकारली.
आडवाणींची तब्येत बिघडली, गेल्या 4-5 महिन्यात चौथ्यांदा रूग्णालयात दाखल
आडवाणींची तब्येत बिघडली, गेल्या 4-5 महिन्यात चौथ्यांदा रूग्णालयात दाखल.
उद्याच महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, कोणता फॉर्म्युला झाला डन?
उद्याच महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, कोणता फॉर्म्युला झाला डन?.
कोल्हापूरच्या नृसिंहवाडीत दत्त जयंतीचा उत्साह, भक्तांची अलोट गर्दी
कोल्हापूरच्या नृसिंहवाडीत दत्त जयंतीचा उत्साह, भक्तांची अलोट गर्दी.