AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Badlapur Protest : ‘त्यापेक्षा बहिणींना सुरक्षा द्या, 1500 रुपये देता भिखारी आहे का?’ बदलापुरात महिलेचा संताप

Badlapur News : बदलापुरात एका नामांकीत शाळेमध्ये दोन चिमुकलींवर अत्याचार झाला आहे. त्यामुळे बदलापूरकरांमध्ये संतापाची भावना आहे. बदलापूरची जनता रस्त्यावर उतरली आहे. रेल रोको आंदोलनाला बसलेल्या एका मंहिलेने तीव्र शब्दात आपला संताप व्यक्त केला. थेट या महिलेने लाडकी बहिण योजनेवर आपला संताप व्यक्त केला.

Badlapur Protest : 'त्यापेक्षा बहिणींना सुरक्षा द्या, 1500 रुपये देता भिखारी आहे का?' बदलापुरात महिलेचा संताप
Badlapur Protest
| Edited By: | Updated on: Aug 20, 2024 | 1:03 PM
Share

कोलकाता येथे ज्यूनियर महिला डॉक्टर सोबत घडलेल्या घटनेमुळे संपूर्ण देशात संतापाची भावना आहे. देशाच्या वेगवेगळ्या भागात अजूनही या घटनेविरोधात निदर्शने, आंदोलन सुरु आहेत. एका नराधमाने हॉस्पिटलमध्ये ज्यूनियर महिला डॉक्टरवर बलात्कार करुन तिची हत्या केली. अशाच प्रकारची एक घटना महाराष्ट्रात सुद्धा घडली आहे. मुंबई जवळ असलेल्या बदलापूरमध्ये जनता रस्त्यावर उतरली आहे. जनतेकडून तीव्र निदर्शने सुरु आहेत. आज बदलापूर बंदची हाक देण्यात आली आहे. बदलापूर येथे एका नामांकीत शाळेत दोन चुमिकलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली आहे.

ही घटना उजेडात आल्यानंतर बदलापूरकरांमध्ये तीव्र संतापाची भावना आहे. शाळेच्या गेटवर पालकांच आंदोलन सुरु आहे. बदलापूरमध्ये रुळावर उतरुन लोकांनी रेल रोको आंदोलन केलं. यामुळे मध्य रेल्वेच्या कल्याण ते कर्जत मार्गावरील वाहतूक मागच्या एक तासापासून ठप्प आहे. शाळेने या प्रकरणी दोन सहाय्यक महिलांना निलंबित केलय. शाळेने माफीनामा सुद्धा लिहून दिलाय. आरोपींवर कठोरात कठोर कारवाई व्हावी म्हणून बदलापूरकर रस्त्यावर उतरले आहेत.

‘सरकार काहीच करत नाहीय’

रेल्वे रुळावर आंदोलनाला बसलेल्या एका महिलेला प्रतिक्रिया विचारली असता तिने तीव्र शब्दात संताप व्यक्त केला. “महाराष्ट्रात बलात्काराचे प्रकार होतायत. सरकार काहीच करत नाहीय. जिथे हे प्रकार घडलेत, त्यांना तसेच कापा. एका माणसामुळे सगळी पब्लिक सकाळी सहा वाजल्यापासून इथे बसली आहे. तुम्ही त्याला सुरक्षा देता. पब्लिकला, मुलीला सुरक्षा देत नाही. सरकार काय करतय? लाडकी बहीण योजना आणता, त्यापेक्षा बहिणीला सुरक्षा द्या. काय करायचीय तुमची लाडकी बहिण योजना? 1500 रुपये देता, भिखारी आहे का?” अशी प्रतिक्रिया या महिलेने दिली.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा