मुसेवालाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी संदिप बिश्नेईची हत्या, बंबिहा गँगचा दावा

या हत्याकांडानंतर लगेचच, दविंदर बंबीहा टोळीने सोशल मीडियावर या हत्येला सूड उगवल्याचे म्हटले आहे.

मुसेवालाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी संदिप बिश्नेईची हत्या, बंबिहा गँगचा दावा
मुसेवालाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी संदिप बिश्नेईची हत्या
Follow us
| Updated on: Sep 20, 2022 | 9:42 PM

नवी दिल्ली : सेठी टोळीचा सदस्य संदीप बिश्नोई (Sandeep Bishnoi) उर्फ ​​सेठी याची राजस्थानमधील नागौर येथील न्यायालयाबाहेर हत्या (Murder) करण्यात आली. संदीपला सुनावणीसाठी नागौर न्यायालयात आणण्यात आले होते. यावेळी काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओमध्ये आलेल्या हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळीबार (Firing) केला. या हल्ल्यात गोळी लागल्याने संदिपचा जागीच मृत्यू झाला. या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारत बंबिहा गँगने ही हत्या मुसेवाला हत्याकांडाचा बदला (Revenge) असल्याचे म्हटले आहे.

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने यूएपीएच्या संबंधित कलमांतर्गत बिश्नोई आणि बंबिहा टोळ्यांविरुद्ध दोन एफआयआर नोंदवले आहेत. या दोन्ही प्रकरणांची एनआयएने दखल घेतली आहे.

या हल्ल्यात मारला गेलेला गुंड संदीप बिश्नोई हा सेठी टोळीचा गुंड होता, जो लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित आहे. या हत्याकांडानंतर लगेचच, दविंदर बंबीहा टोळीने सोशल मीडियावर या हत्येला सूड उगवल्याचे म्हटले आहे. अर्मेनियामध्ये बसून लकी पटियाल हा बंबीहा गँग चालवत आहे.

हे सुद्धा वाचा

सोशल मीडिया पोस्टमध्ये दावा

बंबिहा गँगने या हत्याकांडाची जबाबदारी घेत सोशल मीडियावर पोस्टटाकली आहे. या पोस्टमध्ये बंबिहा गँगने लिहिले की, लॉरेन्स बिश्नोई, जग्गू भगवानपुरिया आणि गोल्डी ब्रार यांचीही अशीच अवस्था होईल.

यानंतर आणखी एक पोस्ट आली. त्या पोस्टमध्ये कथितपणे गोल्डी ब्रारशी जोडलेल्या एका अकाऊंटवरुन बंबिहा टोळीचा दावा निराधार असल्याचा दावा केला होता. तसेच हे जुन्या वैमनस्याचे प्रकरण असल्याचे म्हटले.

पीडित आणि हल्लेखोर दोघेही त्याच्या टोळीचे माहिती देणारे होते आणि त्यांच्यात 10 वर्षांपासून वैर होते. हे वैर सोडवण्याचाही प्रयत्न केला. सोशल मीडियावर बदल्याची भाषा करुन बदला घेता येत नाही, असा दावा गोल्डी ब्रारने केला आहे.

सोशल मीडियात गुंडांची चलाखी

खुनासारखे गंभीर प्रकरण सोशल मीडियावर ठळकपणे मांडणे ही टोळ्यांची जुनी पद्धत आहे. पंजाबी गायक आणि काँग्रेस नेता सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येनंतर लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सदस्य असलेल्या गोल्डी ब्रारने सोशल मीडियावर मुसेवालाच्या हत्येला विक्की मिद्दूखेरा याच्या मृत्यूचा बदला म्हणून संबोधले होते.

बिश्नोई आणि बंबिहा टोळ्यांमधील शत्रुत्वाने कायद्याची अंमलबजावणी करणार्‍या एजन्सींची झोप उडवली आहे. पंजाब पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप बिश्नोईच्या हत्येचा सिद्धू मूसवाला हत्येशी संबंध अद्याप उघड झालेला नाही.

तथापि, गोल्डी ब्रारच्या कथित सोशल मीडिया पोस्टमध्ये, मृत संदीप बिश्नोईचे वर्णन बिश्नोई टोळीचा गुप्तहेर म्हणून करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या गुंडांवर यूएपीए लागू होऊनही हे टोळीयुद्ध सुरू आहे.

UAPA च्या संबंधित कलमांतर्गत दोन स्वतंत्र एफआयआर नोंदवण्यात आले आहेत. एक लॉरेन्स बिश्नोई टोळी आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध . दुसरी दविंदर बंबीहा टोळी आणि त्याच्या गुंडांच्या विरोधात. एनआयएच्या सहकार्याने स्पेशल सेलने हे प्रकरण हाताळले आहे.

दहशतवादविरोधी एजन्सीने गेल्या आठवड्यात उत्तर भारतात अशा गुंडांच्या घरांवर आणि त्यांच्या शूटर्सच्या काही कथित ठिकाणांवर छापे टाकले होते. दोन्ही टोळ्या उत्तर भारतात टार्गेट मर्डर करण्यासाठी शस्त्रे मिळवत असल्याची माहिती स्पेशल सेलला मिळाली होती. यानंतर छापा टाकण्यात आला होता.

संदीप बिश्नोई हत्येचा तपास

राजस्थान पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे नागौर हत्याकांडात सहभागी असलेल्या पाच हल्लेखोरांची ओळख पटवली आहे. दरम्यान, बंबीहा टोळीच्या दाव्याचाही पोलीस तपास करत आहेत.

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.