AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आईशप्पथ ! मास्क घातला नाही म्हणून पोलिसांनी हाता-पायावर खिळे ठोकले?

मुलाने मास्क वापरला नाही म्हणून पोलिसांनी त्याच्या हाता-पायावर खिळे ठोकले, असा गंभीर आरोप एका महिलेने केला आहे (Bareilly woman allegations on police of harassment on her son)

आईशप्पथ ! मास्क घातला नाही म्हणून पोलिसांनी हाता-पायावर खिळे ठोकले?
प्रातिनिधिक फोटो
| Updated on: May 27, 2021 | 3:06 PM
Share

लखनऊ : राज्यासह देशभरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क वापरणं अनिवार्य आहे. मात्र, तरीही काही नागरिक आजही मास्कचा वापर करताना दिसत नाहीत. त्यामुळे पोलिसांकडून कडक कारवाई करण्यात येत आहे. पण उत्तर प्रदेशच्या बरेली शहरात पोलिसांची प्रचंड अमानुष अशी कारवाई केल्याचा आरोप एका महिलेने केला आहे. संबंधित महिलेच्या मुलाने मास्क वापरला नाही म्हणून पोलिसांनी त्याच्या हाता-पायावर खिळे ठोकले, असा गंभीर आरोप तिने केला आहे. याशिवाय महिला याविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात गेली तर तिला उलट धमकावण्यात आलं, असं महिलेने म्हटलं आहे (Bareilly woman allegations on police of harassment on her son).

महिलेचे आरोप नेमके काय?

संबंधित महिला ही बरेली येथील जोगी नवादा येथे वास्तव्यास आहे. आपल्या मुलाला न्याय मिळावा यासाठी ती याचना करत आहे. तिने पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. “माझ्या मुलाने मास्क घातलं नाही म्हणून पोलिसांनी त्याला उचललं आणि ते त्याला घेऊन गेले. आम्हाला याबाबत माहिती मिळाली तेव्हा आम्ही पोलीस चौकीत चौकशीसाठी गेलो. मात्र, तिथे गेल्यावर माहिती पडलं की, मुलाला आणखी दुसऱ्या ठिकाणी घेऊन गेले आहेत. आम्ही त्याला शोधण्याचा प्रयत्न केला. जेव्हा तो आम्हाला भेटला तेव्हा त्याच्या हाता-पायात खिळे ठोकण्यात आले होते”, असं महिला म्हणाली.

“विशेष म्हणजे आम्ही जेव्हा पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार देण्यासाठी गेलो तेव्हा कुणीही आमचं ऐकून घेतलं नाही. उलट आम्हालाही जेलमध्ये टाकणार, अशी धमकी देण्यात आली. त्यामुळे आम्ही थेट वरिष्ठ पोलीस अधीक्षकाकडे तक्रार केली”, असं महिलेने म्हटलंय.

पोलिसांकडून आरोपांचं खंडन

दुसरीकडे पोलिसांनी महिलेच्या सर्व आरोपांचं खंडन केलं आहे. संबंधित युवक हा गुन्हेगार आहे, असं एसएसपी रोहित सजावाण यांनी सांगितलंय. तरुणावर अनेक पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर स्वरुपाचे वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. या सर्वांपासून सुटका मिळावी यासाठी तरुण पोलिसांवर अशाप्रकारचे गंभीर आरोप करत आहे, असं पोलिसांचं म्हणणं आहे (Bareilly woman allegations on police of harassment on her son).

हेही वाचा : अमानुष! आधीच लॉकडाऊन, त्यात दंडुका तुटेपर्यंत पोलीसांचा मार, जालन्याच्या व्हिडीओवर लोक भडकले

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.