वसुलीचा अजब प्रकार, कर्जाची रक्कम परत मिळवण्यासाठी Loan Appने शेअर केले महिलेचे आक्षेपार्ह फोटो

मुंबईत गुन्ह्यांचे प्रमाण प्रचंड वाढू लागले आहे, त्यातच आता शहरातील एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ब्युटिशिअन म्हणून काम करणाऱ्या महिलेला भयानक घटनेचा सामना करावा लागला आहे. एका Loan Appने या महिलेचे आक्षेपार्ह अवस्थेतील फोटो शेअर केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला.

वसुलीचा अजब प्रकार, कर्जाची रक्कम परत मिळवण्यासाठी Loan Appने शेअर केले महिलेचे आक्षेपार्ह फोटो
Follow us
| Updated on: Apr 11, 2024 | 12:57 PM

मुंबईत गुन्ह्यांचे प्रमाण प्रचंड वाढू लागले आहे, त्यातच आता शहरातील एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. येथे ब्युटिशिअन म्हणून काम करणाऱ्या महिलेला भयानक घटनेचा सामना करावा लागला आहे. एका Loan Appने या महिलेचे आक्षेपार्ह अवस्थेतील फोटो शेअर केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. त्या Loan App ने तिचे नग्न आणि मॉर्फ केलेलेे फोटो तिच्या ओळखीच्या लोकांसोबत शेअर केले. हा प्रकार समोर आल्यानंतर संबंधित ब्युटिशिअनने एलटी मार्ग पोलीस ठाण्यात धाव घेत गुन्हा दाखल केला आहे

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ब्युटीशिअन असलेल्या या महिलेने संबंधित लोन अ‍ॅपवरुन 1 एप्रिल रोजी 10 हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र ते वसूल करण्यासाठी या लोन अ‍ॅपने ब्युटिशिअनचे आक्षेपार्ह अवस्थेतील आणि मॉर्फ केलेले फोटो, त्या महिलेच्या मित्र परिवारातील लोकांना तसेच तिच्या नातेवाईकांना पाठवले.

नेमकं काय घडलं ?

मुंबईत राहणाऱ्या या महिलेला 1 एप्रिल रोजी Everloan या कर्ज देणाऱ्या अ‍ॅपबाबत माहिती मिळाली. ते 7 दिवसांसाठी कमी व्याजदरात तात्काळ कर्ज देतात.. त्या महिलेला पैशांची गरज असल्याने तिने तिचे फोटो आणि आवश्यक कागदपत्रे अ‍ॅपला पुरवली आणि 10 हजार रुपयांची रक्कम कर्ज म्हणून घेतली. कर्ज फेडण्याची मुदत संपत आली. शेवटच्या दिवशी त्या ब्युटिशअनला कर्ज देणाऱ्या अ‍ॅपकडून फोन आला. तेथून बोलणाऱ्या व्यक्तीने तिला कर्ज फेडण्यासाठी तिच्याकडे फक्त 30 सेकंद शिल्लक राहिल्याची आठवण करून दिली.

त्यानंतर अवघ्या काही क्षणातच ती ब्युटिशअन आणि तिच्या ओळखीच्या 2 लोकांच्या मोबाईलवर त्या महिलेचे आक्षेपार्ह अवस्थेतील फोटो आले. एवढंच नव्हे तर त्या महिलेच्या मोबाईवर एक मेसेज आला. लवकरच तुझे मॉर्फ केलेले व्हिडिओ तुझ्या ओळखीच्या लोकांशी शेअर केले जातील, असे त्यामध्ये लिहीले होते. पुढे आणखी बदनामी होऊ नये या भीतीने त्या महिलेने कर्ज घेतलेली रक्कम घाईघाईत भरली. पण त्यानंतर तिने थेट पोलिसांत धाव घेत त्यांच्यासमोर सर्व प्रकार कथन करत मदत मागितली.

तिच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी अज्ञात गुन्हेगारांविरोधात आयपीसी अंतर्गत खंडणी फसवणूक आणि गुन्हेगारी धमकी तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

Non Stop LIVE Update
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.