AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अंबाजोगाईचं जोडपं, अमेरिकेत हत्या-आत्महत्या, पण 3 वर्षाच्या चिमुरडीचं काय होणार?

विहाच्या भविष्याची तरतूद म्हणून 2 लाख 13 हजार डॉलर (अंदाजे 1 कोटी 60 लाख 10 हजार रुपये) इतका निधी जमवण्याचे लक्ष्य आहे. (Beed Couple Murder fund for Daughter)

अंबाजोगाईचं जोडपं, अमेरिकेत हत्या-आत्महत्या, पण 3 वर्षाच्या चिमुरडीचं काय होणार?
मयत आरती आणि बालाजी रुद्रावार यांची कन्या विहाचा ताजा फोटो (डावीकडे)
| Updated on: Apr 14, 2021 | 12:58 PM
Share

मुंबई : नोकरीनिमित्त अमेरिकेत राहत असलेल्या बीडच्या अंबेजोगाईतील रुद्रावार दाम्पत्याचा संशयास्पद मृत्यू (Indian Couple Suspicious Murder in US) झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. आठवडा उलटल्यानंतरही बालाजी आणि आरती रुद्रावार यांच्या मृत्यूचं गूढ अद्याप कायम आहे. पण या सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न उरतो, ते दोघांच्या पश्चात साडेतीन वर्षांच्या चिमुरडीचं काय होणार? बालाजी आणि आरती यांची कन्या विहा रुद्रावार सध्या न्यूजर्सीत त्यांच्या फॅमिली फ्रेण्ड्सकडे आहे. तिच्या भवितव्यासाठी ऑनलाईन निधी संकलित केला जात आहे. (Beed Ambejogai Couple Aarti Balaji Rudrawar Murder Suicide Case in New Jersey America  gofundme.com raises fund for Daughter Viha Rudrawar)

विहाच्या भविष्यासाठी ऑनलाईन फंड

रुद्रावार दाम्पत्याच्या परिचयातील गोविंदसिंह निहलानी यांनी ‘गो फंड मी’ या वेबसाईटच्या माध्यमातून फंड गोळा करण्याचे आवाहन केले आहे. पाश्चात्य देशांमध्ये ऑनलाईन फंडरेझर ही लोकप्रिय संकल्पना आहे. वैद्यकीय उपचार, शैक्षणिक खर्च किंवा पालकांच्या निधनानंतर पोरक्या झालेल्या अल्पवयीन मुलांच्या संगोपनासाठी अशाप्रकारे निधी जमा केला जातो.

किती रुपये जमा?

विहाच्या भविष्याची तरतूद म्हणून 2 लाख 13 हजार डॉलर (अंदाजे 1 कोटी 60 लाख 10 हजार रुपये) इतका निधी जमवण्याचे लक्ष्य आहे. आतापर्यंत (बुधवार 14 एप्रिल दुपारी एक वाजेपर्यंत) जवळपास 2300 जणांनी आपापल्या परीने आर्थिक मदत केली आहे. त्यातून 1 लाख 30 हजार 439 डॉलर (अंदाजे 98 लाख 4 हजार रुपये) इतका निधी जमा झाला आहे. म्हणजेच निर्धारित टार्गेटच्या साठ टक्क्यांहून रक्कम जमा करण्यात यश आलं आहे. आपल्यालाही मदत करायची असल्यास इथे क्लिक करुन डोनेट करु शकता.

विहाचा ताबा कोणाकडे?

दरम्यान, बालाजी आणि आरती यांच्या पार्थिवावर न्यूजर्सीत अंत्यसंस्कार होणार की बीडमधील मूळगावी हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. त्याचप्रमाणे त्यांची कन्या विहा हिचा सांभाळ कोण करणार, तिचा ताबा कोणाकडे असेल, यासारखे अनेक प्रश्न अद्याप अनुत्तरित आहेत. मात्र आठवड्याच्या अखेरपर्यंत तिचे कुटुंबीय अमेरिकेला येऊन तिला मायदेशी नेणार असल्याचं समजतं. विहाला दत्तक दिले जाईल का, असा प्रश्न विचारण्यात आला असून त्याबाबत तिचे आजी-आजोबा सध्या तरी उत्सुक नसल्याचं समजतं.

“बालाजी पत्नीला भोसकू शकत नाही”

बालाजी रुद्रवार यानेच पत्नीची चाकूने भोसकून हत्या केली आणि त्यानंतर स्वतःवर वार करुन आत्महत्या केली, अशा बातम्या न्यू जर्सीमधील माध्यमांकडून प्रकाशित झाल्या आहेत. अद्याप प्रशासकीय पातळीवरुन कोणतीही माहिती बालाजीच्या कुटुंबीयांना देण्यात आलेली नाही. परंतु बालाजी असं करु शकत नाही, असा दावा बालाजीचे वडील भारत रुद्रावार यांनी केला आहे. या सर्व प्रकरणानंतर बालाजी आणि त्याच्या पत्नीचा घातपात झाला असल्याचा संशय त्याच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. (Beed Couple Murder fund for Daughter)

बालाजी-आरती रुद्रावार संशयास्पद मृत्यू

32 वर्षीय बालाजी रुद्रवार आणि 30 वर्षीय आरती रुद्रवार यांचा मृतदेह गेल्या बुधवारी न्यूजर्सीतील राहत्या अपार्टमेंटमध्ये चाकूने भोसकलेल्या अवस्थेत आढळला होता. बुधवारी सायंकाळी त्यांची चार वर्षीय मुलगी विहा गॅलरीत बराच वेळ एकटीच रडत बसल्याचे शेजाऱ्यांना दिसले. त्यामुळे संशय आल्याने त्यांनी या घटनेबद्दल पोलिसांना कळवले होते. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

आरती रुद्रावार सात महिन्यांची गर्भवती

अंबेजोगाईतील प्रसिद्ध व्यापारी भारत रुद्रवार यांचा बालाजी हा मुलगा होता. आयटी कंपनीतील नोकरीच्या निमित्ताने बालाजी सहा वर्षांपूर्वी अमेरिकेत न्यू जर्सीमधील अर्लिंग्टन भागात स्थायिक झाला होता. बालाजीची पत्नी आरती रुद्रावार सात महिन्यांची गर्भवती होती, अशी माहिती समोर आली आहे.

संबंधित बातम्या :

अंबाजोगाईचं जोडपं, अमेरिकेत घटना, त्या खुनाचं कारण काय?

अमेरिकेत असं काय घडलं की अंबाजोगाईच्या बालाजीनं बायकोला मरेस्तोवर भोसकलं? मग बालाजी कसा संपला?

(Beed Ambejogai Couple Aarti Balaji Rudrawar Murder Suicide Case in New Jersey America  gofundme.com raises fund for Daughter Viha Rudrawar)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.