अमेरिकेतल्या त्या घटनेला 8 दिवस पूर्ण, दोन नाही तर तिघांवर अंत्यसंस्कार होणार, अंबाजोगाईला प्रतिक्षा ‘विहा’ची

आरती-बालाजी आणि 7 महिन्याच्या गर्भावर अंत्यसंस्कार करण्याची तयारी केली जात आहे. अंबाजोगाईहून आरती आणि बालाजी यांचे भाऊ अमेरिकेला जाण्याच्या तयारीत आहेत. (Indian Couple Rudrawar Murder last rites )

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 13:41 PM, 15 Apr 2021
अमेरिकेतल्या त्या घटनेला 8 दिवस पूर्ण, दोन नाही तर तिघांवर अंत्यसंस्कार होणार, अंबाजोगाईला प्रतिक्षा 'विहा'ची
आरती-बालाजी रुद्रावार यांच्यासह आरतीच्या गर्भातील बाळावरही अंत्यसंस्कार होणार

बीड : बालाजी रुद्रावार आणि आरती रुद्रावार यांच्या हत्या आणि आत्महत्येनं (Indian Couple Suspicious Murder in US) एक अख्खं कुटुंब उद्धवस्त झालं आहे. ज्या आरतीचा खून बालाजीनं केला ती आरती 7 महिन्यांची गरोदर होती, यावर आता शिक्कामोर्तब झालं आहे. एवढंच नाही तर आरतीच्या पोटात मुलाचा गर्भ होता असंही अमेरिकन न्यूज एजन्सीनं बातमी दिली आहे. डेली व्हॉईसमध्ये हे वृत्त प्रकाशित झालं आहे. (Beed Ambejogai Indian Couple Aarti Balaji Rudrawar Murder Suicide in New Jersey last rites in America)

तो गर्भ मुलाचा

गेल्या बुधवारी अमेरिकेतल्या न्यूजर्सी भागात बालाजी रुद्रावारनं त्याची पत्नी आरती रुद्रावार हिचा चाकूनं भोसकून खून केला. आरती त्यावेळेस 7 महिन्यांची गरोदर होती. बालाजीनं तिच्या पोटाचे स्लाईस केल्याची माहिती कोर्टात देण्यात आली आहे. खुद्द बालाजीच्या अंगावर तेवढ्याच गंभीर जखमा होत्या. त्यातल्या काही दोघांच्या झटापटीत झालेल्या होत्या तर काही खुद्द बालाजीनं स्वत:वर वार करुन घेतल्याचं उघड झालं आहे. म्हणजेच बालाजीनं आधी आरतीचा खून केला आणि नंतर आत्महत्या. या सगळ्यात एकाच चाकूचा वापर करण्यात आल्याचही कोर्टात सांगण्यात आलं आहे. आरती आणि बालाजी रुद्रावार हे मूळचे अंबाजोगाईचे असून ते गेल्या काही वर्षापासून अमेरिकेत होते. बालाजी हा एका आयटी कंपनीत इंजनिअर होता.

अंत्यसंस्कार अमेरिकेतच होणार

घटनेला आठ दिवस आता उलटून जातायत पण अजूनही अंत्यसंस्कार झालेले नाहीत. आरती-बालाजी आणि 7 महिन्याच्या गर्भावर अंत्यसंस्कार करण्याची तयारी केली जात आहे. अंबाजोगाईहून आरती आणि बालाजी यांचे भाऊ अमेरिकेला जाण्याच्या तयारीत आहेत. व्हिसासाठी प्रयत्न केले जात आहेत. अंत्यसंस्कार अमेरिकेतच करण्याचं कुटुंबियांनी निश्चित केलं आहे. त्यासाठी अमेरिकेतील भारतीय सामाजिक संस्था सर्व तयारी करत आहेत. पुजाऱ्यांपासून इतर सर्व विधी करण्यात काही अडचणी येत असल्याचेही डेली व्हॉईस ह्या अमेरिकन न्यूज साईटनं बातमी दिली आहे.

विहाचं भविष्य अधांतरी

दरम्यान आरती आणि बालाजी यांच्या साडे तीन वर्षाच्या मुलीच्या भविष्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. या चिमुकलीचं नाव विहा असून तीच बालकनीत रडत उभी होती. ती का रडते आहे याची चौकशी केली असता, आरती आणि बालाजीचं हत्या आत्महत्येची घटना उघड झाली. विहाला भारतात आणण्याचा प्रयत्न केला जातो आहे तसच तिच्यासाठी अमेरिकेत डोनेशन उभं केलं जात आहे. आणि त्याला दोन हजारपेक्षा जास्त दात्यांनी सढळ हाताने मदत केली आहे. विहाला अमेरिकेतच दत्तक द्यायचं की अंबाजोगाईला आणायचं यावर संभ्रम होता पण ती काही काळ तरी अंबाजोगाईला येणार अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. (Indian Couple Rudrawar Murder last rites )

असं नेमकं का घडलं?

आठवडा उलटून गेला असला तरीसुद्धा ही घटना का घडली याबद्दल मात्र अजूनही काही माहिती समोर आलेली नाही. म्हणजे सात महिन्याच्या गरोदर पत्नीला एवढ्या क्रूर पद्धतीनं भोसकून मारण्या इतपत काय घडलं याचं उत्तर अजूनही मिळत नाही. आरती आणि बालाजी दोघेही प्रेमळ कुटुंब होतं असं सर्वजण सांगतायत पण तेच प्रेम अचानक एवढ्या तीव्र द्वेषात कसं काय बदललं याचं उत्तर मिळालेलं नाही. पुढच्या काही दिवसात न्यू जर्सी पोलीस याबाबत खुलासा करतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

संबंधित बातम्या :

अंबाजोगाईचं जोडपं, अमेरिकेत हत्या-आत्महत्या, पण 3 वर्षाच्या चिमुरडीचं काय होणार?

अमेरिकेत असं काय घडलं की अंबाजोगाईच्या बालाजीनं बायकोला मरेस्तोवर भोसकलं? मग बालाजी कसा संपला?

(Beed Ambejogai Indian Couple Aarti Balaji Rudrawar Murder Suicide in New Jersey last rites in America)