मुलांना सांभाळा, बीडमध्ये तीन मित्रांनी गमावला जीव, वाचा काय घडलं?

बीडमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या तीन जिवलग मित्रांचा बुडून मृत्यू झाला आहे. Beed three boys died due to drown in water

मुलांना सांभाळा, बीडमध्ये तीन मित्रांनी गमावला जीव, वाचा काय घडलं?
प्रतिकात्मक फोटो
Yuvraj Jadhav

|

Apr 17, 2021 | 11:37 AM

बीड: शहरापासून जवळ असलेल्या पांगरबावडी शिवारात पोहायला गेलेल्या तीन जिवलग मित्रांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. तिघे मित्र शुक्रवारी सांयकाळी पोहण्यासाठी खदानीमध्ये गेले होते. मात्र, तिघाचांही बुडून मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मुलांसह पालकांनी अशा घटना रोखण्यासाठी जागरुक होण्याची गरज व्यक्त केली जात आहे. ( Beed three boys died due to drown in water at Pangarbavadi)

तिघेही जिवलग मित्र

पांगरबावडी शिवारात पोहण्यासाठी गेलेल्या तीन जिवलग मित्रांचा खदानीत बुडून मृत्यू झाला. ओम जाधव, मयूर गायकवाड, श्याम देशमुख अशी मृत मुलांची नावे आहेत. हे तिघेही बीड शहरातील गांधीनगर भागातील रहिवासी असल्याची माहिती आहे.

आई वडिलांना एकुलते एक

ओम जाधव, मयूर गायकवाड, श्याम देशमुख हे तिघांच्या मृत्यूमुळं त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. कारण, तिघेही त्यांच्या आई-वडिलांचे एकुलते एक मुलगे होते. ही घटना बीड शहरपासून जवळच असलेल्या पांगरबावडी शिवारात घडलीय. बीड तालुक्यातील पांगरबावडी शिवारातील बायपासनगरी येथील खदाणीत तिघे पोहण्यासाठी गेले होते. याप्रकरणी पुढील तपास बीड ग्रामीण पोलीस करीत आहेत.

पालकांनी मुलांची काळजी घेण्याची गरज

उन्हाळा आल्यानंतर ग्रामीण भागात मुलं पोहायला जातात. यामध्ये काहीवेळा ज्यांना पोहायाला येत नाही ती मुलं देखील पोहायला जातात. पोहायला येत नसतानाही पाण्यात बुडून मृत्यू झाल्याच्या घटना दरवर्षी समोर येतात. मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू होऊ नये यासाठी पालकांनी काळजी घेण्याची गरज आहे.

बीडमध्ये सेल्फी घेताना धरणात बुडून दोघांचा मृत्यू

सेल्फी घेण्याच्या नादात आतापर्यंत अनेकांनी जीव गमावल्याच्या घटना घडत असतात. मागील महिन्यात बीड जिल्ह्यात सेल्फी काढण्याच्या नादात धरणात पडून दोन सख्या भावांचा मृत्यू झाला होता. मालेगाव तालुक्यातील विराने शिवारात ही घटना घडली होती. हर्षल जाधव (22) , रितेश जाधव (18) असे बुडून मृत्यू झालेल्या भावांची नाव आहेत. विराने तलावाच्या काठावर ते सेल्फी काढत होते.

संबंधित बातम्या

मुलांना सांभाळा, कोल्हापुरात रंगपंचमी खेळून पोहायला गेलेल्या तिघांचा मृत्यू

पनवेलमध्ये दुहेरी हत्याकांड, लग्नास नकार दिल्यानं मुलीसह आईची हत्या

(Beed three boys died due to drown in water at Pangarbavadi)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें