‘रोहित’ बनून ‘आफताब’कडून पाच वर्षांपासून शोषण, धर्मांतरासाठी धमकी, तरुणीचा खळबळजनक दावा

पीडितेने महिलेने सांगितले की आफताबने स्वतःचे नाव रोहित असल्याचे खोटे सांगून तिला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. खोटे सांगून त्याने मुलीसोबत अनेक वेळा चुकीच्या गोष्टीही केल्या

'रोहित' बनून 'आफताब'कडून पाच वर्षांपासून शोषण, धर्मांतरासाठी धमकी, तरुणीचा खळबळजनक दावा
प्रातिनिधीक फोटो

भोपाळ : मध्य प्रदेशातील उज्जैन शहरात मंगळवारी रात्री उशिरा दोन पोलीस स्टेशनमध्ये कलम 376 अंतर्गत गुन्हे दाखल झाले आहेत. यामुळे पोलीस प्रशासन सतर्क झाल आहे. एक तरुणी तिच्या कुटुंबातील सदस्य आणि बजरंग दल या हिंदुत्ववादी संघटनेतील कार्यकर्त्यांसह महिला पोलीस ठाण्यात पोहोचली होती. गेली 5 वर्षे आफताब नावाचा मुलगा आपले नाव रोहित असल्याचे सांगून शोषण करत असल्याचा आरोप महिलेने केला. एवढेच नाही तर तो आपल्यावर धर्म बदलण्यासाठी दबाव आणत असल्याचा दावाही तिने केला.

काय आहे प्रकरण?

पीडितेने महिलेने सांगितले की आफताबने स्वतःचे नाव रोहित असल्याचे खोटे सांगून तिला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. खोटे सांगून त्याने मुलीसोबत अनेक वेळा चुकीच्या गोष्टीही केल्या. तो त्याच्याजवळ चाकू ठेवायचा, ज्याद्वारे तो मुलीला धमकावायचा आणि तिच्यावर धर्मांतर करण्यासाठी दबाव आणायचा. या प्रकरणाला गांभीर्याने घेत महिला पोलीस स्टेशनने आरोपी आफताबला अटक केली आहे आणि त्याच्याविरुद्ध लव्ह जिहाद प्रकरणी अनुसूचित जाती, जमाती, धार्मिक स्वातंत्र्य, 376 (2) (एन), 506, 323 मध्ये गुन्हा दाखल केला आहे.

उज्जैनमध्येही तरुणीवर अत्याचार

दुसरीकडे, महाकाळ पोलीस स्टेशन अंतर्गत एक घटना उघडकीस आली आहे, जिथे आपल्या कुटुंबासह पोलिसात पोहचलेल्या मुलीने सांगितले की ती तिच्या साथीदाराला भेटण्यासाठी मंदसौरहून उज्जैनला आली होती. त्याने आपल्यावर अत्याचार केला. संपूर्ण प्रकरण गांभीर्याने घेत पोलिसांनी कलम 376 अंतर्गत गुन्हा दाखल करुन आरोपी तरुणाचा शोध सुरु केला आहे.

पुण्यात लग्नाच्या आमिषाने पोलिसाचा तरुणीवर बलात्कार

दुसरीकडे, तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून पोलीस उपनिरीक्षकाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना पुण्यात उघडकीस आली आहे. प्रवीण जरदे असे बलात्काराचा गुन्हा दाखल झालेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे.

काय आहे प्रकरण?

आरोपी प्रविण नागेश जर्दे (रा. शांतीबन सोसायटी, कोथरुड) हा सध्या पुण्यातील वाहतूक शाखेतील येरवडा विभागात कार्यरत आहे. प्रवीण स्वतः विवाहित असताना सुद्धा 25 वर्षांच्या तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून गेल्या दोन वर्षापासून तो बलात्कार करत असल्याचा आरोप आहे. या प्रकरणी कोथरुड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.

तक्रारदार तरुणीशी ओळख आणि प्रेम

2019 मध्ये प्रवीण जरदे हा कोथरुड पोलिसात कार्यरत होता. पोलीस स्थानकात तक्रार देण्यासाठी आलेल्या एका तरुणीची आणि त्याची ओळख झाली होती. ओळखीचे रुपांतर प्रेमात होऊन तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तो दोन वर्षांपासून बलात्कार करत होता.

संबंधित बातम्या :

लग्नाच्या आमिषाने महिला पोलीस अधिकाऱ्यावर बलात्कार, डोंगरीत पोलीस अधिकाऱ्यावर गुन्हा

नांदेडच्या पोलीस निरीक्षकाकडून बलात्कार, वाशिममधील महिला पोलीस शिपायाच्या आरोपाने खळबळ

सोलापूरमध्ये महिला पोलीस कॉन्स्टेबलचा संशयास्पद मृत्यू, पतीकडून PSI सोबतच्या संबंधातून आत्महत्येचा दावा

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI