राष्ट्रवादीचे नेते राजेश विटेकर यांचा महिलेवर बलात्कार, तृप्ती देसाईंची पीडितेसह पत्रकार परिषद

राजेश उत्तमराव विटेकर यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करा, यामध्ये त्यांच्या आईही सहभागी आहेत, असा आरोप तृप्ती देसाईंनी केला आहे. (Trupti Desai NCP Leader Rajesh Vitekar )

राष्ट्रवादीचे नेते राजेश विटेकर यांचा महिलेवर बलात्कार, तृप्ती देसाईंची पीडितेसह पत्रकार परिषद
तृप्ती देसाई यांचा राष्ट्रवादीचे नेते राजेश विटेकर यांच्यावर आरोप
Follow us
| Updated on: Apr 01, 2021 | 12:44 PM

मुंबई : परभणी जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे लोकसभा उमेदवार आणि नेते राजेश उत्तमराव विटेकर (Rajesh Vitekar) यांनी एका महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई (Trupti Desai) यांनी केला आहे. विटेकरांवर बलात्काराचा गुन्हा दाखल करा, या मागणीसाठी पीडितेसह तृप्ती देसाई यांनी पत्रकार परिषद घेतली. (Bhumata Brigade Trupti Desai claims Parbhani NCP Leader Rajesh Vitekar allegedly Raped lady)

पीडितेचा आरोप काय?

“माझे अश्लील व्हिडीओ तयार करण्यात आले आहेत. वर्षभरापासून माझ्यावर अत्याचार करण्यात आला. मी तक्रार करुनही अद्याप गुन्हा दाखल केलेला नाही. माझ्याकडे पुरावे आहेत, पण फक्त तपास सुरु असल्याचे सांगितले जाते. शरद पवार यांच्यामुळे आपल्यावर गुन्हा दाखल होणार नाही, असं राजेश विटेकर म्हणतात” असा दावा पीडितेने केला आहे. राजेश विटेकर यांच्यावर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करा, यामध्ये त्यांच्या आईही सहभागी आहेत, असा आरोप तृप्ती देसाईंनी केला.

कोण आहेत राजेश विटेकर?

39 वर्षीय राजेश विटेकर हे परभणी जिल्हा परिषद अध्यक्ष सोनपेठ कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती परभणी जिल्हा मध्यवर्ती बँक संचालक परभणी लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडणूक शिवसेना उमेदवार संजय (बंडू) जाधव यांच्याकडून पराभव 4 लाख 96 हजार 742 मतं मिळवत विटेकर दुसऱ्या क्रमांकावर 5.3 कोटी रुपयांची संपत्ती, तर 8.7 लाखांचे उत्पन्न, प्रतिज्ञापत्रात उल्लेख राजेश विटेकर पदवीधर असून शेती व्यवसाय असल्याचाही उल्लेख

“आणखी एका राष्ट्रवादीच्या नेत्याकडून लग्नाच्या, नोकरीच्या अमिषाने एका महिलेवर लैंगिक अत्याचार… तृप्ती देसाई यांची बारा वाजता पीडितेसह पत्रकार परिषद” अशी फेसबुक पोस्ट लिहून तृप्ती देसाई यांनी राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडवून दिली होती.

यापूर्वी सामाजिक कल्याण मंत्री धनंजय मुंडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यासारख्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांवर लैंगिक अत्याचाराचे आरोप झाले होते. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी आपल्या आयुष्यातील महिलेविषयी जाहीर वाच्यता केली. तर त्यांच्याविरोधात आरोप करणाऱ्या महिलेने ही तक्रार नंतर मागे घेतली.  (Bhumata Brigade Trupti Desai claims Parbhani NCP Leader Rajesh Vitekar allegedly Raped lady)

महाविकास आघाडी सरकारवर आरोप

दुसरीकडे, शिवसेनेचे नेते आणि माजी वनमंत्री संजय राठोड यांच्यावरही गंभीर आरोप झाले होते. एका तरुणीच्या आत्महत्येनंतर राठोड संशयाच्या भोवऱ्यात अडकले होते. त्यामुळे या प्रकरणाच्या चौकशीसाठी त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा स्वीकारण्याचा निर्णय घेतला. मात्र दोघा मंत्र्यांवरील आरोपांमुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत आलं होतं.

संबंधित बातम्या :

मी धनंजय मुंडेंविरोधातील बलात्काराची तक्रार मागे घेते, कारण… : रेणू शर्मा

संजय राठोडांचा राजीनामा फक्त दिखाव्यापुरता?; भाजप आमदार म्हणतात, शिवसेना भवनात फ्रेम करुन ठेवला!

मेहबूब शेख यांच्यावर बलात्काराचा आरोप, औरंगाबाद पोलिसांकडून सलग 6 तास चौकशी

(Bhumata Brigade Trupti Desai claims Parbhani NCP Leader Rajesh Vitekar allegedly Raped lady)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.