AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nityanand Rai : केंद्रीय मंत्र्याच्या भाच्याची मर्डर, बहिण जखमी

Nityanand Rai : एक धक्कादायक घटना घडली आहे. गोळीबारात एका केंद्रीय मंत्र्याच्या भाच्याचा मृत्यू झाला आहे. प्राथमिक तपासात नळावरुन भांडण झाल्याच समोर आलय.

Nityanand Rai : केंद्रीय मंत्र्याच्या भाच्याची मर्डर, बहिण जखमी
Central Minister Relative DeadImage Credit source: TV9 Hindi
| Updated on: Mar 20, 2025 | 1:03 PM
Share

अंतर्गत कौटुंबिक वादातून झालेल्या गोळीबारात एका केंद्रीय मंत्र्याच्या भाच्याचा मृत्यू झाला आहे. बिहारच्या भागलपुरमध्ये ही गोळीबाराची घटना घडली. अंतर्गत वादातून झालेल्या या गोळीबारात केंद्रीय गृह राज्य मंत्री नित्यानंद राय यांच्या एका भाच्याचा मृत्यू झाला. दुसरा भाचा आणि बहिण गंभीररित्या जखमी झाले आहेत. नवगछियाच्या जगतपुर भागातील ही घटना आहे. दोन भाऊ आपसात भिडले. परस्परांवर गोळीबार केला. एकाचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी आहेत. मृताची ओळख पटली असून त्याचं नाव विश्वजीत आहे. जयजीत आणि त्याची आई मीना जखमी झाले आहेत. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, दोन भावांमध्ये गोळीबाराची ही घटना घडली. यात एका भावाचा मृत्यू झाला आहे. दुसरा जखमी आहे. मृत विश्वजीतच्या आईच्या हाताला गोळी लागली. नळाच्या पाण्यावरुन दोघांमध्ये भांडण झालं. त्यानंतर दोघांमध्ये हाणामारी झाली. जयजीतने गोळीबार केला. विश्वजीतचा रुग्णालयाच्या वाटेवर असताना मृत्यू झाला. जयजीत गंभीररित्या जखमी झाला.

कुणीच काही बोलतय नाहीय

भाजपा एमएलसी डॉक्टर एनके यादव यांच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. विश्वजीतचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. नवगछियाचे एसपी प्रकरणाचा तपास करत आहेत. हायप्रोफाईल प्रकरण असल्याने नातेवाईक प्रसारमाध्यमांना घरी येऊ देत नाहीयत. त्या सोबतच कुणीच काही बोलतय नाहीय.

पोलिसांनी काय सांगितलं?

नवगछियाचे एसपी प्रेरणा कुमार यांनी सांगितलं की, जगतपुर गावात दोन भावंडांनी आपसात गोळीबार केल्याची माहिती मिळाली. परबत्ता SHO घटनास्थळी पोहोचले. दोन्ही जखमींना रुग्णालयात हलवलं. एसडीपीओ सुद्धा रुग्णालयात गेले. रुग्णालयातून मिळालेल्या माहितीनुसार, एकाचा मृत्यू झाला असून दुसरा जखमी आहे. या वादात त्यांच्या आईच्या हाताला गोळी लागली.

पुढची कारवाई काय?

प्राथमिक तपासात नळावरुन भांडण झाल्याच समोर आलय, असं एसपी प्रेरणा कुमार यांनी सांगितलं. आम्ही सध्या जबानी नोंदवत आहोत. जबानीतून जी माहिती समोर येईल, त्या आधारावर पुढची कारवाई होईल. घटनास्थळावर एक खोका आणि गोळी सापडली आहे. FSL टीम तपास करत आहे. पूर्ण रिपोर्ट आल्यानंतर पुढील कारवाई होईल.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.