AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बँड बाजा, वरात, घोडा सगळं तय्यार होतं; पण त्यापूर्वीच वधूने केलं असं कांड…

बिहारमधील कैमूरमध्ये लग्नाच्या दिवशी एक धक्कादायक घटना घडली. लग्नाच्या आधीच वधूने मोठं कांड केलं. वरात येण्याच्या काही काळ आधीच हा प्रकार उघड झाला. कुटुंबियांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.

बँड बाजा, वरात, घोडा सगळं तय्यार होतं; पण त्यापूर्वीच वधूने केलं असं कांड...
| Updated on: May 26, 2025 | 9:51 AM
Share

बिहारमधील कैमूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. तेथे एका तरूणीचं लग्न ठरलं, लग्नाचा दिवस उजाडला. बँडबाजा, घोड़ा, वरात घेऊन नवरा मुलगा आणि घरचे तय्यार होते. सगळ्यांची लगबग सुरू होती, हसतंखेलतं वातावरण होतं, मात्र तेवढ्यात घरचा फोन वाजला आणि एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं. फोनवर मिळालेल्या निरोपाने घरात शोककळा पसरली, कोणालाही काही सुचेचना. लग्नापूर्वी, वरात घरात येण्यापूर्वी वधून जे कांड केलं त्याने फक्त तिच्या घरच्यांच्या नव्हे तर वराच्या घरातील लोकांच्या तोंडचं पाणीही पळालं.

वराकडचे लोकं वरात घेऊन जाण्याच्याआधीच एक कॉल आला आणि कळलं की जिच्याशी लग्न होणार होतं ती वधूच गायब झाली आहे. या बातमीने कुटुंबात खळबळ उडाली. दुसरीकडे, वर लग्नाच्या मिरवणुकीसह वधूच्या घरी जाण्यास तयार होता. वधूच्या घरच्यांन ही बातमी सांगितल्यानं वरानेही डोक्यावर हात मारला.

या घटनेबाबत वधूच्या वडिलांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. कैमूरच्या चैनपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हाटा शहरातील एका परिसरात ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येथे राहणाऱ्या एका कुटुंबातील मुलीचे शनिवारी लग्न होते. संपूर्ण कुटुंब बऱ्याच दिवसांपासून लग्नाची तयारी करत होते. वधूच्या पंसतीनेच सगळी खरेदी केली होती, असं तिच्या वडिलांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत नमूद केलं होतं. बाकीची तयारीही झालीच होती, आता पक्त लग्न लागणं बाकी होतं.

वधूच्या वडिलांनी वराच्या घरी केला फोन आणि..

शनिवारी दुपारी, कुटुंबातील सदस्य लग्नाच्या मिरवणुकीची, अर्थात वरातीच्या स्वागताची तयारी करत होते. पण जिचं लग्न होतं ती बराच काळ घरात दिसलीच नाही. बराच वेल सगळीकडे शोधाशोध करण्यात आली, पण तिचा काहीच पत्ता लागला नाही. अखेर होणारी वधू ही घरातून पळून गेल्याचे उघड झाले. हे ऐकून लग्नघरात गदारोल माजला, अखेर कुटुंबियांनी पोलिसांत जाऊन तक्रार दाखल केली. पण ही बातमी वराला कशी सांगायची, असा यक्षप्रश्न कुटुंबासमोर होता. अखेर बराच विचार केल्यानंतर, वधूच्या वडिलांनी कसाबसा धीर एकटवटला आणि वराच्या वडिलांना फोन करून या घटनेची माहिती दिली.

पोलिसांकडून वधूचा शोध सुरू

हा फोन आला तोपर्यंत वरही लग्नाच्या वरातीसह निघण्यास तयार झाला होता. सगळेच घरही जमले होते. पण तेवढ्यात ही बातमी ऐकून सगळेच हादरले. काय करावं, बोलावं कोणालाचा काही समजेना. चैनपूरचे एसएचओ विजय कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीच्या वडिलांच्या जबाबाच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र अद्याप त्या युवतीचा पत्ता लागलेला नाही.

Follow Us
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन शेतकऱ्यांकडे जा; संजय राऊतांचा विरोधकांना सल्ला