AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अख्खं राज्य हादरलं… चालत्या अ‍ॅम्ब्युलन्समध्ये महिला पेशंटवर बलात्कार, ड्रायव्हर आणि टेक्निशियनच्या कृत्याने संतापाची लाट

धक्कादायक घटनेने संपूर्ण राज्य हादरून गेलंय. भरती प्रक्रियेदरम्यान मुलीची तब्येत अचानक बिघडली. त्यानंतर तिला ताबडतोब मेडिकल कॉलेज रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, वाटेत अ‍ॅम्ब्युलन्समध्ये तिच्यावर बलात्कार करण्यात आला.

अख्खं राज्य हादरलं... चालत्या अ‍ॅम्ब्युलन्समध्ये महिला पेशंटवर बलात्कार, ड्रायव्हर आणि टेक्निशियनच्या कृत्याने संतापाची लाट
ambulance
| Updated on: Jul 26, 2025 | 2:23 PM
Share

एक अतिशय धक्कादायक अशी घटना पुढे आली. होमगार्डच्या भरतीसाठी मैदानात दाखल झालेल्या एक मुलीवर बलात्कार झाला. या घटनेने मोठी खळबळ उडाली. होमगार्डच्या भरती प्रक्रियेदरम्यान मैदानात धावत असताना चक्कर आल्याने मुलगी जमिनीवर कोसळली. त्यानंतर तात्काळ तिला रूग्णालयात दाखल करण्यासाठी अ‍ॅम्ब्युलन्स बोलावण्यात आली. मात्र, अ‍ॅम्ब्युलन्स चालक आणि टेक्निशियनमधील राक्षस जिवंत झाले आणि चक्क अ‍ॅम्ब्युलन्समध्येच तिच्यावर बलात्कार करण्यात आला. या घटनेने खळबळ उडाली असून पीडितेने तक्रार दाखल केली. 26 वर्षीय मुलीवर होमगार्ड उमेदवारावर चालत्या अ‍ॅम्ब्युलन्समध्ये बलात्कार करण्यात आला. ही घटना बिहारमधील बोधगया येथे घडली, येथील बीएमपी 3 मध्ये होमगार्ड भरती प्रक्रिया सुरू आहे.

मिळालेली अधिक माहिती अशी की, भरती प्रक्रियेदरम्यान मुलीची तब्येत अचानक बिघडली. त्यानंतर तिला ताबडतोब मेडिकल कॉलेज रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, वाटेत अ‍ॅम्ब्युलन्समध्ये तिच्यावर बलात्कार करण्यात आला. पोलिसांना दिलेल्या जबाबात पीडित मुलीने सांगितले की, अ‍ॅम्ब्युलन्समध्ये उपस्थित असलेल्या लोकांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. तेव्हा ती बेशुद्ध अवस्थेत होती. सध्या पीडितेवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पीडित मुलगी ही इमामगंज पोलिस स्टेशन परिसरातील रहिवासी आहे. पीडितेने दिलेल्या जबाबानंतर बोधगया पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आली. एसएसपी आनंद कुमार यांनी लगेचच कारवाई करण्याचे आदेश दिले. या प्रकरणी आतापर्यंत दोन आरोपींना पोलिसांनी अटक केलीये. पीडितेने आपल्या जबाबात दोनपेक्षा अधिक जण असल्याचा दावा केलाय. यामुळे याप्रकरणी अजून काही आरोपींना अटक केली जाऊ शकती. तात्काळ या प्रकरणात एसआयटीची स्थापना देखील करण्यात आली.

एसएसपी आनंद कुमार यांनी सांगितले की, घटनेच्या दोन तासांमध्येच अ‍ॅम्ब्युलन्स चालक विनय कुमार आणि टेक्निशियन अजित कुमार यांना अटक करण्यात आली. पिडितेनेच रुग्णालयात दाखल केल्यानंतर आपल्यासोबत नेमके काय घडले हे डॉक्टरांना सांगितले. याप्रकरणात पोलिसांनी तात्काळ कारवाई केली. काही महत्वाच्या गोष्टी तपासात पुढे आल्या. ज्यावेळी ही घटना घडली, त्यावेळी अ‍ॅम्ब्युलन्समध्ये नेमके कोण कोण होते, याचा तपास घेतला जातोय. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची मदत घेतली जात आहे.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.