AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सोशल मीडियावर ओळख, मैत्रीनंतर प्रेम, मग रिलेशनशीप नंतर हत्या…काय घडले नेमके

Mumbai Crime News: १४ एप्रिल रोजी शानूचा वाढदिवस होता. तिला तिचा वाढदिवस डांबरबहादूरसोबत साजरा करायचा होता. त्यामुळे १३ एप्रिल रोजी सायंकाळी ती त्याच्या घरी राहण्यासाठी आली होती. यावेळी त्यांच्यासोबत त्याची आई घरी होती. या दोघांनी रात्री वाढदिवस साजरा करून मद्यप्राशन केले.

सोशल मीडियावर ओळख, मैत्रीनंतर प्रेम, मग रिलेशनशीप नंतर हत्या...काय घडले नेमके
| Updated on: Apr 17, 2024 | 10:46 AM
Share

सध्या सोशल मीडियावर युवक-युवती चांगलेच सक्रीय असतात. मग एकमेकांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवण्यापासून सुरुवात होते. त्यानंतर मैत्री तयार होते. भेटीगाठी होता. मैत्रीचे रुपातंर प्रेमात होते. कधी लग्न तर कधी रिलेशनशीप होते. परंतु या प्रकरणातून हत्या होण्याचे प्रकार वाढत आहेत. मुंबईत प्रेयसीच्या हत्या प्रकरणात एका ३० वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. वाढदिवस साजरा करण्यासाठी आलेल्या प्रेयसीची प्रियकराने हत्या केल्याची घटना कांदिवली परिसरात घडली होती. त्या प्रकरणात डांबरबहादूर खडके विश्‍वकर्मा (३०) याल समतानगर पोलिसांनी अटक केली आहे.

कशी झाली दोघांची ओळख

डांबरबहादूर खडके विश्‍वकर्मा हेमकुमारी मोतीराम भट ऊर्फ शानू हे सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात आले. ते दोघेही मुळचे नेपाळमधील रहिवाशी आहेत. शानू नेपाळमधील रहिवासी असून ती कांदिवलीतील अशोकनगर परिसरात घरकाम करीत होती. तर डांबरबहादूर सुरक्षा रक्षक म्हणून काम करीत होता. काही महिन्यांपूर्वी त्यांची समाजमाध्यमावर ओळख झाली. त्यानंतर ओळखीचे रुपांतर मैत्रीत झाले. त्यानंतर त्यांच्यात प्रेम निर्माण झाले. गेल्या सहा महिन्यांपासून ते दोघेही रिलेशनशीपमध्ये होते.

क्षुल्लक वादातून ही हत्या झाली

१४ एप्रिल रोजी शानूचा वाढदिवस होता. तिला तिचा वाढदिवस डांबरबहादूरसोबत साजरा करायचा होता. त्यामुळे १३ एप्रिल रोजी सायंकाळी ती त्याच्या घरी राहण्यासाठी आली होती. यावेळी त्यांच्यासोबत त्याची आई घरी होती. या दोघांनी रात्री वाढदिवस साजरा करून मद्यप्राशन केले.

यावेळी त्यांच्यात क्षुल्लक कारणावरून कडाक्याचे भांडण झाले. राग अनावर झाल्याने डांबरबहादूरने शानूला जोरात भिंतीवर आदळले. त्यावेळी ती जागीच कोसळली. या घटनेत तिचा मृत्यू झाला. तिच्या हत्येप्रकरणी आरोपी प्रियकर डांबरबहादूर खडके विश्‍वकर्मा याला पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले. त्याची पोलीस कोठडी घेतली आहे. या प्रकाराने परिसरात खळबळ उडाली आहे.

समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस.
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते.
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!.
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली.
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा.
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई.
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव.
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका.
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला.
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली.